मारहाण करुन लुटणा-या टोळीची 3 वर्षानंतर उकल घटनेला अनैतिक संबंधाची किनार, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कामगिरी

मारहाण करुन लुटणा-या टोळीची 3 वर्षानंतर उकल
घटनेला अनैतिक संबंधाची किनार,
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कामगिरी.
अहमदनगर दि. ७ सप्टेंबर (प्रतिनिधी)
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आगामी सण व उत्सव अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, सफौ/ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, विश्वास बेरड, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, पोकॉ/अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, मपोना/भाग्यश्री भिटे, मपोकॉ/ज्योती शिंदे, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व चापोना/भरत बुधवंत यांचे पथक नेमून हद्दपार इसमांना चेक करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक अहमदनगर शहरातील हद्दपार गुन्हेगारांना चेक करत असतांना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, हद्दपार इसम नामे स्वप्निल वाघचौरे रा. भिंगार, अहमदनगर हा त्याचे राहते घरी येणार असुन त्याचे ताब्यात चोरीची विना नंबरची एव्हिएटर मोपेड मोटार सायकल आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.
पथकाने दि.05/09/2023 रोजी बातमीतील हद्दपार आरोपी नामे स्वप्निल वाघचौरे रा. भिंगार, ता. नगर याचे वास्तव्या बाबत माहिती घेवुन त्याचे राहते घरी जावुन खात्री करता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) स्वप्निल सुनिल वाघचौरे वय 24, रा. प्रबुध्दनगर, भिंगार अहमदनगर असे सांगितले. त्यास त्याचे घरा समोरील पडवीत लावलेली विनाक्रमांक निळे रंगाचे एव्हिएटर मोटार सायकल बाबत विचारपुस करता त्याने समर्पक उत्तर देण्यास टाळाटाळ केली. पथकाने एव्हिएटर इंजिन व चेसीस नंबर वरुन मालकाचा शोध घेतला असता ती संदीप मच्छिंद्र वाघ याची असल्याचे पथकाचे निदर्शनास आले, त्यावरुन आरोपीस अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने इसम 2) अशोक नामदेव जाधव रा. शाहुनगर, केडगांव, अहमदनगर याने 70 हजार रुपये देवुन खंडाळा, ता. नगर येथील संदीप मच्छिंद्र वाघ यास मारण्याची सुपारी दिल्याने इतर साथीदार नामे 3) प्रताप सुनिल भिंगारदिवे वय 27, 4) विशाल ऊर्फ झंडी लक्ष्मण शिंदे वय 37 दोन्ही रा. सावतानगर, भिंगार, अहमदनगर, 5) रविंद्र विलास पाटोळे वय 33, प्रबुध्दनगर, भिंगार, अहमदनगर व 6) अशोक नामदेव जाधव वय 40, रा. शाहुनगर, केडगांव, अहमदनगर यांना तसेच भिंगार येथुन एक इको चारचाकी गाडी भाड्याने घेवुन केडगांव परिसरातील हॉटेल मैत्री जवळ जावुन संदीप मच्छिंद्र वाघ याचे डोक्यात व पायावर जबर मारहाण केली व त्याचे जवळील एव्हिएटर मोटार सायकल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिल्याने सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरुन इको कार व एव्हिएटर मोटार सायकलसह ताब्यात घेतले. आरोपींचे दोन साथीदार नामे 6) रविंद्र धिवर, 7) संदीप पाटोळे फरार आहेत. आरोपीने दिलेल्या कबुलीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 6272/2020 भादविक 397 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सुपारी देणारा आरोपी अशोक नामदेव जाधव याचेकडे संदीप मच्छिंद्र वाघ यास मारण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्याने अनैतिक संबंधाचे कारणावरुन जिवे ठार मारुन चोरीचा बनाव करण्यासाठी 70 हजार रुपायांची सुपारी दिल्याची कबुली दिली आहे.
नमुद हद्दपार गुन्हेगारांचे हद्दपार आदेशाबाबत खात्री करता आरोपी 1) स्वप्निल सुनिल वाघचौरे व 2) प्रताप सुनिल भिंगारदिवे दोन्ही रा. भिंगार, ता. नगर यांना हद्दपार प्राधिकर तथा, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचेकडील आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. दोन्ही आरोपी हे हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या नगर शहर भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द कोतवाली पो.स्टे. येथे मपोका 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पुढील कार्यवाही कोतवाली पोस्टे करीत आहे. आरोपीचे दोन फरार साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.
आरोपी नामे स्वप्निल सुनिल वाघचौरे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गंभीर दुखापत व इतर कलमान्वये एकुण – 8 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. भिंगार कॅम्प गु.र.नं 104/15 पसंकाक 15, 19
2. नगर तालुका गु.र.नं 992/20 भादविक 307, 354, 452, 323, 504, 506, 143, 147,148
3. भिंगार कॅम्प गु.र.नं 124/21 भादविक 354 (ड), 506 पोक्सो ऍ़क्ट 12
4. भिंगार कॅम्प गु.र.नं 222/21 भादविक 354,323,504,34 पोक्सो ऍ़क्ट 34
5. भिंगार कॅम्प गु.र.नं 476/22 भादविक 324, 323, 504, 506, 143, 147
6. भिंगार कॅम्प गु.र.नं 538/22 भादविक 325, 324, 323, 504, 506, 143, 147, 149
7. भिंगार कॅम्प गु.र.नं 55/23 भादविक 326, 324, 143, 147, 149, 504, 506, 31
8. भिंगार कॅम्प गु.र.नं 176/2023 म.दा.का.क 65 (ई)
आरोपी अशोक नामदेव जाधव हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दुखापत व फसवणुक असे दोन गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. कोतवाली गु.र.नं 92/14 भादविक 143, 147, 149, 323, 504, 506
2. कोतवाली गु.र.नं 521/21 भादविक 420,406,34
आरोपी प्रताप सुनिल भिंगारदिवे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गंभीर दुखापत असे एकुण – 5 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. नगर तालुका गु.र.नं 992/20 भादविक 307, 354, 452, 323, 504, 506, 143, 147, 148,
2. भिंगार कॅम्प गु.र.नं 222/21 भादविक 354, 323, 504, 34 पोक्सो ऍ़क्ट 34
3. भिंगार कॅम्प गु.र.नं 538/22 भादविक 325, 324, 323, 504, 506, 143, 147, 149
4. भिंगार कॅम्प गु.र.नं 476/22 भादविक 324, 323, 504, 506, 143, 147
5. भिंगार कॅम्प गु.र.नं 55/23 भादविक 326, 324, 143, 147, 149, 504, 506, 31
आरोपी विशाल लक्ष्मण शिंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द चोरी, दुखापत व इतर कलमान्वये एकुण – 3 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. भिंगार कॅम्प गु.र.नं. 61/2012 भादविक 324, 323, 504, 506, 34
2. भिंगार कॅम्प गु.र.नं. 93/2012 भादविक 452, 324, 327, 504, 34
3. कोतवाली गु.र.नं. 140/2017 भादविक 188, 283, 290, 34 पर्या.का.क.5,6,15,19
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उविपोअ, नगर शहर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.