ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा उद्या जिल्हा दौरा

अहमदनगर दि. 29 (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शनिवार दिनांक 30 एप्रिल2022 रोजी दुपारी 12 वाजता व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह, पुणे येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता खरिप हंगाम नियोजनाबाबत बैठक (जिल्हा अधीक्षक कृषी). स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथून मोटारीने पानोली ता. पारनेरकडे प्रयाण. सायंकाळी 4.15 वाजता शिक्षक मेळावा. स्थळ – खंडेकर मंगल कार्यालय, जामगाव रोड, पारनेर. सायंकाळी 5.30 वाजता जि.प. प्राथमिक शाळा, पानोली येथील नवीन वर्ग खोल्या व फ्युचरीस्टीक क्लास रुमचे व विविध विकास कामांचा उदघाटन समारंभ. स्थळ- पानोली ता. पारनेर. सायंकाळी 7वाजता पारनेर येथून मोटारीने अहमदनगर कडे प्रयाण. रात्रौ. 8 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन व मुक्काम.
रविवार दिनांक 01 मे 2022 रोजी राखीव. स्थळ- शासकीय विश्रामगृह अहमदनगर. सकाळी 8वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड, अहमदनगर. सकाळी 8.30वाजता अहमदनगर येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण.