राजकिय

संविधानामुळे प्रत्येकजण सुरक्षित – दिलीप सातपुते

केडगावच्या शिवसेनेच्या वतीने आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर दि.१५ (प्रतिनिधी) -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री तथा न्याय मंत्री होते. त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकजण सुरक्षित रहावा, यादृष्टीने काम केले. त्यांनी दीनदलितांच्या उत्थानाकरिता व भारतातील मागासवर्गाच्या प्रगतीसाठी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण जीवनाचा त्याग केला. माणसाला स्वाभिमानाने जगणे शिकवले. ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र त्यांनी आम्हाला दिला. संविधानामुळे आज सर्वजण सुरक्षित आहे, असे प्रतिपादन शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केडगाव शिवसेनेच्या वतीने आंबेडकर चौक येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री. सातपुते बोलत होते. कार्यक्रमास नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, बबलू शिंदे, संग्राम कोतकर, विठ्ठलमहाराज कोतकर, विजय पोटे आदी उपस्थित होते.
बबलू शिंदे म्हणाले की, जातीपातीचा भेदभाव, स्पृश्य-अस्पृश्य ही दरी मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवाज उठवला. सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत व मंदिरे सर्वच जातीधर्मासाठी खुली केली. प्रत्येकजण समाजाचा एक भाग आहे. संविधानाचा मुख्य उद्देश जातीपातीचा भेदभाव व अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मिती करणे, समाजात क्रांती आणणे यासोबतच सर्वांना समानतेचा अधिकार प्राप्त करून देणे हा होता. आज समाजात प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार डॉ. आंबेडकर यांच्यामुळे मिळाला, हे आमचे भाग्य असल्याचे ते म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे