भिंगार शहरात चालतोय राजरोसपणे मटका पोलीस कधी देणार कायद्याचा फटका!

अहमदनगर दि.५(प्रतिनिधी) भिंगार शहर व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सट्टा,मटका, जुगार काही ठिकाणी बिंगो अशाप्रकारचे बेकायदेशीर धंदे खुलेआम तेजीत सुरू आहेत.
या सर्व प्रकाराच्या धंद्याबाबत भिंगार पोलीस ठाणे काहीच कारवाई करताना का दिसत नाहीत?अशा प्रकारच्या प्रश्नार्थक चर्चा भिंगार शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.एकंदरीतच काय भिंगार शहरात राजरोसपणे खेळला जाणारा मटका,याला पोलीस कधी देणार कायद्याचा फटका! अशा भावना नागरिकांच्या आहेत असो!
भिंगार शहरात शुक्रवार बाजारात नागपुरे चहावाल्या समोर,हजारे बंधू भेळ सेंटरच्या उजव्या बाजूला,सुलभ स्वचछतागृहाच्या बाजूला तसेच पाण्याच्या टाकीखाली दोन बिंगो व शुक्रवार बाजारात एक बिंगो नावाचा जुगार व आपण कधी बारकाईने निरीक्षण केले तर त्याठिकाणी मटका खेळण्याचा उद्योग दररोज सुरू आहे हे आपल्या लक्षात येईल. विशेष म्हणजे हा सर्व परिसर भिंगार पोलीस ठाण्याच्या जवळच आहे. नगर- पाथर्डी रस्त्यावर वडारवाडी येथे त्रिमूर्ती कापडाच्या दुकानासमोर,त्याच रस्त्यावर दिलखुश चिकन दुकाना शेजारी,नगर पाथर्डी विजय लाईन येथील रिक्षा स्टॉप शेजारी,तसेच त्याच रस्त्यावर पंचशील कमानी शेजारी व पोलीस लाईन मटका चालतोय तसेच भंडारी दाताच्या दवाखान्याशेजारी भोले चहावाल्या समोर मटक्याचे धंदे पडदे लावून सुरू आहेत.यासर्व प्रकारावर पोलिसांचीच मुक संमती आहे का?असा सवालही भिंगार शहरातील नागरिकांकडून दबक्या आवाजात उपस्थित केला जातोय हे वास्तव आहे.एकंदरीतच भिंगार शहरात अशा प्रकारे काळे धंदे चालतात तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भागामध्ये काय चालत असेल याबाबत आपण दृष्टिक्षेप टाकणारच आहोत.भिंगार पोलीस ठाण्याच्या प्रमाणेच आपण शहरातील नगर तालुक्यातील तसेच एमआयडीसी आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणारे बेकायदेशीर धंद्याबाबत आवाज उठविणारच आहोत.
या सर्व प्रकाराच्या धंद्याबाबत भिंगार पोलीस ठाणे काहीच कारवाई करताना का दिसत नाहीत?अशा प्रकारच्या प्रश्नार्थक चर्चा भिंगार शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.एकंदरीतच काय भिंगार शहरात राजरोसपणे खेळला जाणारा मटका,याला पोलीस कधी देणार कायद्याचा फटका! अशा भावना नागरिकांच्या आहेत असो!
यासर्व प्रकारावर पोलिसांचीच मुक संमती आहे का?असा सवालही भिंगार शहरातील नागरिकांकडून दबक्या आवाजात उपस्थित केला जातोय हे वास्तव आहे.एकंदरीतच भिंगार शहरात अशा प्रकारे काळे धंदे चालतात तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भागामध्ये काय चालत असेल याबाबत आपण दृष्टिक्षेप टाकणारच आहोत.भिंगार पोलीस ठाण्याच्या प्रमाणेच आपण शहरातील नगर तालुक्यातील तसेच एमआयडीसी आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणारे बेकायदेशीर धंद्याबाबत आवाज उठविणारच आहोत.



