पाऊस समाधानकारक, नैसर्गिक आपत्ती, राजा व प्रजेला त्रास तर बाजारात तेजी-मंदी गोदड महाराज यांच्या संवत्सरीत भाकित

पाऊस समाधानकारक, नैसर्गिक आपत्ती, राजा व प्रजेला त्रास तर बाजारात तेजी-मंदी गोदड महाराज यांच्या संवत्सरीत भाकित
कर्जत प्रतिनिधी : दि ३ एप्रिल
येत्या वर्षी पाऊस समाधानकारक होईल. वादळे व नैसर्गिक आपत्तीचा अतिवृष्टी यांचा मुकाबला करावा लागेल. तसेच बाजारात तेजी मंदी राहील. राजा व प्रजेला त्रास होईल असे भाकीत गोदड महाराज यांच्या संवत्सरीत वर्तविण्यात आले. कर्जतचे ग्रामदैवत श्री संत गोदड महाराज मंदिरात आज सालाबादाप्रमाणे गुढी पाडव्याच्या दिवशी गोदड महाराज यांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरीचे वाचन पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी केले. या वर्षीचे भाकित ऐकण्यासाठी मंदीर व परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गोदड महाराज यांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरीचे वाचन मंदीरात केले जाते. आगामी वर्षे कसे असेल याचा अंदाज या संवत्सरीत व्यक्त केला जातो. हे भाकीत ऐकण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. आगामी पावसाळ्यात पुर्व मोसमी पावसाचा अंदाज आहे तर तीव्र उन्हाळा व वळवाचा पाऊस असा अनुभव येईल. मान्सूनचे आगमन नियोजीत वेळे अगोदर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला व समारोपाला समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चैत्र ते भाद्रपद या सहा महिन्यात राजा व प्रजेला बिकट परिस्थितीतून जावे लागेल. वादळे येतील तसेच नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करावा लागेल. बाजारात तेजी मंदी जाणवेल नंतर भाव कमी होऊन स्थिरता येईल. येत्या पावसाळ्यात मृग, आर्द्रा, पुनरवसु, पुष्य, अशलेशा, मघा, उत्तरा, चित्रा, या नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडेल तर पुर्वा, हस्त, स्वाती या नक्षत्रात पावसाबाबत अनिश्चितता वर्तविण्यात आली आहे.