अहिल्यानगर दि. 24 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर शहर मतदार संघांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत महानगर पालिकेचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले,( शिवसेना शिंदे गटाचे) जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे समन्व्यक महेंद्र गंधे, माजी नगरसेवक अविनाश घुले, माजी नगरसेवक सचिन जाधव, माजी नगरसेवक किशोर डागवाले, प्रा. माणिक विधाते, संजय ढोणे, अमोल गाडे, नरेंद्र कुलकर्णी, अजिंक्य बोरकर, सुमित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा