अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्यामुळे व बेकायदेशीर रास्तारोको करून दहशत निर्माण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा: समाजवादी पार्टीची मागणी
कापड बाजार येथे एका हातगाडी धारक व दुकानदार यांच्या मध्ये किरकोळ वादावरून सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जातीय वाद केल्याचा आरोप

अहमदनगर दि.१४(प्रतिनिधी)- कापड बाजार येथे एक हातगाडी लावण्यावरून हातगाडी धारक व दुकानदार यांच्या मध्ये किरकोळ वादावरून सत्ताधारी राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जातीय तेढ निर्माण करून
बेकायदेशीर रित्या रस्तारोक आंदोलन करून एका समाजाबद्दल अपशब्द वापरून घोषणाबाजी केली व परिसरात काहीकाळ ताणाव पूर्वक वातावरण निर्माण करून दहशत निर्माण करण्याचे काम केल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टी च्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी अहमदनगर दक्षिण प्रमुख महासचिव फिरोज पठाण, जहीर सय्यद आदी सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांनी कोणीही मध्यस्थी न करता फक्त राजकारणासाठी आपल्या राजकीय फायद्यासाठी व्यापाऱ्यांच्या बाजूने येऊन हातावर पोट असलेले गरीब हातगाडी चालकांवर अन्याय करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले. व हे पुढारी असे प्रत्येक ठिकाणी जाऊन जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करतात मागील 2 महिन्यापूर्वी भिंगार येथिल आलमगीर भागात किरकोळ वाद झाले. त्याठिकाणी सत्ताधारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी जाऊन तिथे जातीय तेढ निर्माण करून देण्याचे काम केले. परंतु भिंगार पोलिसांच्या मध्यस्थीने ते वाद आपसात मिटविण्यात आले.
अश्या प्रकारे शहरात जातीयवाद करून शहराचे वातावरण खराब करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे दोन समाजामध्ये आपसात वाद होऊ नये म्हणून सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर २ दिवसात बेकायदेशीर रास्तारोको आंदोलन व दहशत निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावे अन्याता समाजवादी पार्टीच्या वतीने बेमुद्दत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.