अनधिकृत फटाका स्टॉलवर कारवाई करण्याची फटाका असोसिएशन ची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे मागणी

अहमदनगर दि. 10 नोव्हेंबर (प्रतिनिधी ): नगर शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या
अनाधिकृत फटाका स्टॉल तसेच प्रशासनाने रस्त्यावर परवानगी दिलेल्या फटाका स्टॉलवर कारवाई करण्याचे चे निवेदन दि अहमदनगर जिल्हा फटाका असोसिएशने जिल्हाधाकारी श्री सिध्दराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांना देण्यात आले आहे. अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुरेश जाधव व सचिव श्री श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे, नगर शहरामध्ये रस्त्यावर व नागरी वसाहतीमध्ये विनापरवाना फटाका स्टॉल उभारून, फटाक्यांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले असून ही बाब गंभीर असून मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या स्टॉलधारकांकडे कुठल्याही प्रकारची परवाना किंवा आग विझविण्यासाठी अग्निशमन गाड्यांची व्यवस्था नाही, तसेच सिसफायर,
सुरक्षे संबंधी कोणतीही व्यवस्था नाही. तसेच वाळूच्या बादल्यांची
व्यवस्था नाही, पत्र्यांची शेड देखील नाही. अशा उगड्यावर फटाक्यांची
विक्री चालू आहे. अशा चुकीच्या पध्दतीने परवानगी दिलेल्या स्टॉलवर
कारवाई होणे गरजेचे आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन ही नोंदणीकृत संस्था असून
शासनाच्या स्फोटक कायदे अंतर्गत सर्व नियमांच्या आधीन राहुन तसेच
सर्व परवाने प्राप्त केलेली संस्था आहे अशी माहिती असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश जाधव व सचिव श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.