राजकिय

नामदार रामदासजी आठवले यांचा झंझावती अहमदनगर दौरा……

अहमदनगर (प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, नामदार रामदासजी आठवले यांचा ११ व १२ मार्च रोजी अहमदनगर जिल्ह्य दौऱ्यावर येत
असून त्यांचा हा झंझावती दौरा पुढीलप्रमाणे
११ मार्च रोजी शिर्डी नगरीत आगमन शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम
१२ मार्च रोजी सकाळी १० वाजता ते
खासदार सुजय विखे यांच्या समवेत प्रवरा लोणी येथील शासकीय कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.दुपारी १:०० वाजता शासकीय विश्रामगृह औरंगाबाद रोड अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी:- २ः०० वाजता
अहमदनगर जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन.
स्वास्तिक चौक, बसस्थानक शेजारी, नगर-पुणे रोड,दुपारी २ः१५ वाजता निंबोडी,नगर-जामखेड रोड येथे
अहमदनगर दक्षिण युवक जिल्हाध्यक्ष दिवंगत अशोक जगन्नाथ केदारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार असून दिवंगत अशोक जगन्नाथ केदारे यांच्या स्मरनार्थ बांधलेल्या कमानीचे उदघाटन करणार आहेत.त्यांच्या समवेत संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, अविनाश महातेकर,विजयराव वाकचौरे,राजाभाऊ कापसे,आदी उपस्थित राहणार आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन माजी नगरसेवक तथा उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, ज्येष्ठ नेते विजयराव भांबळ,किरण दाभाडे,अमित काळे,मंगेश मोकळ,शफीभाई,सदाशिव भिंगारदिवे,चंद्रकांत भिंगारदिवे,विनोद भिंगारदिवे, जयाताई गायकवाड,अनुसया भाकरे,राहुल भाकरे,वंदना आल्हाट,सुनीता नेटके आदींनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे