राजकिय

“भावी महापौर सुरेशभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” निलक्रांती चौक मित्र मंडळाने निळी शाल, हार देत केला नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांचा सन्मान!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 20 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार ) गट व भाजप युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या, प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती प्रवार्गातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुरेश भाऊ बनसोडे हे विक्रमी मतांनी निवडून आले. शहरातील फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीचे केंद्र बिंदू असलेल्या निलक्रांती चौक येथे त्यांचा निलक्रांती चौक मित्र मंडळाच्या वतीने निळी शाल, हार, घालत सन्मान करण्यात आला. यावेळी ” भावी महापौर सुरेशभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है ” अशा घोषणानी परिसर दणाणून गेला. यावेळी जेष्ठ नेते उदयोजक सुनील साळवे, किशोर साळवे, महेश भोसले, संदेश भोसले,अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, विवेक विधाते, येशूदास वाघमारे,प्रमोद साळवे, वृषाल साळवे, विनोद साळवे, सुशांत शिरसाठ, आकाश कांबळे, रोहित शिरसाठ, संदीप पारधे, गौरव आल्हाट, अभिजित कांबळे, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे