राजकिय

आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे निकटवर्तीय नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे होऊ शकतात महापौर! अहिल्यानगर शहरात राजकीयवर्तुळ, प्रसार माध्यमे, नागरिकांची जोरदार चर्चा!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 18 जानेवारी: अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली, या निवडणुकीच्या निकालाने राष्ट्रवादी (अजित पवार) गट व भाजप यांच्या बाजूने अहिल्या नगर शहरातील मतदारांनी स्पष्ट मतांचा स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे साहजिकच अहिल्यानगर महापालिकेवर महायुतीचा महापौर विराजमान होणार हे निश्चित आहे. आता महापौर पदाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर महानगर पालिकेचे आरक्षण अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी पडल्यास आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे निकटवर्तीय प्रभाग क्रमांक 13 अनुसूचित जाती मधून निवडून आलेले नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांना महापौर पदाची संधी मिळू शकते.
अहिल्यानगर महानगर पालिकेचा इतिहास पाहिलात तर आधाप अनुसूचित जाती (पुरुष) हे आरक्षण महापौर पदासाठी पडलं नाही, मात्र यंदा कदाचित तस होतंय तर या शहराला आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे निकटवर्तीय सुरेश बनसोडे हेच महापौर होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा असताना आता पत्रकारांनाही तेच वाटू लागलंय, आता सुरेश बनसोडे यांची महापौर पदाची लौटरी लागते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे