राजकिय

नगर अर्बन बँक घोटाळा करणाऱ्याला प्रभागातील मतदार घरी बसवतील, प्रभाग 13 मधील नागरिकांनी निवडणूक हातात घेतली आहे: सुरेश बनसोडे राष्ट्रवादीचे (अजित पवार) चारही उमेदवार निवडून येणार, नागरिकांच्या चर्चा!

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 11 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणुक आता काही दिवसांवर राहिली आहे. प्रचाराचा जोर वाढत आहे. कडाक्याच्या थंडीत शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. याबाबत राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाचे उमेदवार सुरेश बनसोडे यांच्याशी देशस्तंभ न्यूजने संवाद साधला, यावेळी बोलतांना ते म्हणाले या पूर्वीच्या नगर सेवकाने काय दिवे लावले हे प्रभागातील नागरिकांना माहिती आहे. नगर अर्बन बँकेत गोर गरीब, मायबाप जनतेच्या ठेवी होत्या. नगर अर्बन बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्याला मतदारच घरी बसवतील, ही निवडणूक प्रभागातील नागरिकांनी हातात घेतल्यामुळे आमचे चारही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभागातील राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे चारही उमेदवार यावेळी निवडून येतील अशा चर्चा नागरिकांमधून होत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे