राजकिय

भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय (आठवले ) गटाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवरांच्या रॅलीस प्रभाग क्रमांक 13 मधून नागरिकांकडून उदंड प्रतिसाद! फुलांच्या वर्षावात रॅलीचे स्वागत!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर, दि.11 जानेवारी:
अहिल्यानगर : दि. 11 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणुक आता काही दिवसांवर राहिली आहे. प्रचाराचा जोर वाढत आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) गट, आरपीआय (आठवले) या महायुती चे उमेदवार
प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार ) गट, आरपीआय (आठवले ) गटाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रभाग 13 मधून निघालेल्या रॅलीस नागरिकांना मधून उदंड प्रतिसाद मिळत आहे. माळीवाडा, सथा कॉलनी, बुरुडगाव रोड व प्रभागातील परिसरातील नागरीकांच्या वतीने फुलांच्या वर्षावात व फटाके उडवत रॅलीचे स्वागत करण्यात येत आहे.

माजी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या बैठकीला व कार्यक्रमाला नागरिक गर्दी करत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे