कौतुकास्पद
गुटखा, सुगंधीत तंबाखुवर तोफखाना पोलीस स्टेशनचा छापा गुटखा व सुगंधीत तंबाखु, स्विफ्ट कार असा एकुण 5,12,436/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त


त्यानंतर सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपी नामे अनिकेत पोपट दळवी, वय 25 वर्षे, रा.न्यु प्रेमदान हाडको, सावेडी, ता जि अहिल्यानगर यास ताबत घेवुन त्याचे मालकीचे सदर स्विफ्ट कारची दोन पंचासमक्ष पाहाणी केली असता त्यामध्ये केसर युक्त विमल पान मसाल्याच्या 13 गोण्या प्रत्येक गोणीमध्ये 22 पुडे , प्रत्येक पुड्यात 11 पाऊच, V-1 तम्बाकु असे इंग्रजीमध्ये नाव असलेले 12 पाकिटे, प्रत्येक पाकीटामध्ये 22 पाऊच, व नमुद स्विफ्ट कार असा एकुण 5,12,436/-रु.किं.चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल व स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रा राज्यामध्ये गुटखा, पान मसाला, सुंगधीत तबाखु, मावा, खर्रा व तस्मत अन्न पदार्थाच्या विक्री, साठा, उत्पदन, वाहतुकीस बंदी घातलेली आहे. सदर अन्न पदार्थ मानवी आरोग्यास हानीकारक आहेत. तसेच त्याच्या सेवानापासुन वेगवेगळ्या प्रकाराचे आजार उद्भवतात. त्यामुळे शरीरास बाधा / हानी पोहचते. याबाबत सदर इसमास ज्ञात असुन देखील वरील आरोपी याने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा करुन महाराष्ट्र शासन यांची अधिसुचना असुमाका/अधिसुचना/411/2025/7 दिनांक.16/07/2025 चे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्याने त्याचे विरुद्ध पो.कॉ 2335 कपिल श्रीराम गायकवाड यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 274, 275,223 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.