देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि., 22 जुलै : 27 जुलै 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संप्पन्न होणार आहे.
या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी शनिवार दिनांक 19 जुलै रोजी आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसराची पाहणी केली.
यावेळी प्रसार माध्यमाना बोलतांना ते म्हणाले, 27जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला महापालिके मार्फत सुप्रसिद्ध भीमगीत गायक आनंद शिंदे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच याच दिवशी महानगर पालिके मार्फत या चौकाचे ‘ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ‘ असे नामांकरण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे जेष्ठ नेते अशोक गायकवाड, विजयराव भांबळ, सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, जेष्ठ नेते संभाजी भिंगारदिवे,माजी नगरसेवक अजय साळवे, माजी नगरसेवक राहुल कांबळे, प्रा. विलास साठे सर,प्रा. भीमराव पगारे सुनील शिंदे, सुनील क्षेत्रे, किरण दाभाडे, महेश भोसले, संजय जगताप, पोपट जाधव, सुमेध गायकवाड, विशाल भिंगारदिवे, विशाल कांबळे,सागर ठोकळ,अमित काळे, विशाल गायकवाड, सिद्धार्थ आढाव, संजय ताकवले, यांच्यासह सर्व समाज बांधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास अहिल्यानगर शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा