कौतुकास्पद

अहिल्यानगर जिल्ह्यातुन हद्दपार केलेले 02 सराईत गुन्हेगार जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 7 जुलै ( प्रतिनिधी) मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी मोहरण सण- उत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा याकरीता पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा यांना अहिल्यानगर शहरातील सराईत गुन्हेगारांना चेक करुन, हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्याविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, शिवाजी ढाकणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, रणजीत जाधव व बाळासाहेब खेडकर अशांना मोहरम सण उत्सवाचे अनुषंगाने अहिल्यानगर शहरामध्ये पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील आरोपी, हद्दपार केलेल्या इसमांना चेक करून मिळून आल्यास कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 05/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा अहिल्यानगर शहरामध्ये शोध घेऊन, 02 सराईत गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द खालीलप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
अ. क्र. पोलीस स्टेशन गुरनं व कलम हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्याचे नाव
1 तोफखाना गु.र.नं. 705/2025 मपोकाक 142 असद गफ्फार शेख, वय 35, रा.दर्गादायरा रोड, मुकूंदनगर, अहिल्यानगर
2 तोफखाना गुरनं 706/2025 मपोकाक 142 सलमान मेहबुब खान, वय 31, रा.कोठला, घासगल्ली, अहिल्यानगर
सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व मा.श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे