गुन्हेगारी

संगमनेर येथे जुगार खेळणारे 14 आरोपी जेरबंद 11,24,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोनि श्री दिनेश आहेर, स्था.गु.शा. अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केलेले होते.
दिनांक 02/07/2025 रोजी पथकातील पोलीस अंमलदार बिरप्पा सिध्दप्पा करमल, बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे, अशोक हिरामन लिपणे, आकाश राजेंद्र काळे, रमिझराजा रफिक आतार हे संगमनेर शहर परिसरामध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास तळेगांव ते नादुर शिंगोटे जाणारे रोडलगत एक इसम त्याचे घराचे बांधकाम चालु असलेल्या घराचे आडोशाला पत्त्यावर पैसे लावुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली. पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी काही इसम दोन डावामध्ये पत्त्यावर पैसे लावुन हारजितीचा जुगार खेळतांना दिसुन आलेे. सदर पत्ते खेळणारे पहिल्या डावातील 1) अजीज अबु शेख वय-45 वर्षे रा.तळेगांव दिघे ता.संगमनेर 2) आकाश बाबासाहेब गडाख, रा. पारेगांव बुाा ता. संगमनेर, 3) योगेश दत्तात्रय राहटळ रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर, 4) भास्कर बाबुराव पगार, रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर, 5) महेंद्र सुंदरलाल पाटणी, रा. तळेगांव दिघे ता. संगमनेर, 6) कैलास कारभारी मळे, रा. काकडवाडी ता.संगमनेर, 7) नंदु म्हतु पिंगळे, रा. तळेगांव दिघे ता. संगमनेर असे तसेच दुसऱ्या डावातील 8) इरफान युनिस शेख रा. लोणी (हसनापुर) ता.राहाता, 9) आशिफ कासम शेख, रा. करोले ता. संगमनेर, 10) रविद्र विठ्ठल जेजुरकर, रा. ममदापुर ता. राहाता, 11) एकनाथ रोहीदास जोरवेकर, रा. पोरेगांव ता. संगमनेर, 12) विलास भास्कर जगताप, रा. तळेगांव दिघे ता.संगमनेर, 13) दशरथ बिरु कांदळकर रा. वज्रडी बुाा ता. संगमनेर, 14) विजय रंभाजी ढवळे, रा.पारेगाव बु ाा ता. संगमनेर अशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने, रोख रक्कम, 13 मोबाईल 9 मोटारसायकल असा 11,24,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील इसमांविरुध्द पोकॉ/203 रमिझराजा रफिक आतार यांचे फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 438/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व श्री कुणाल सोणवने सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग संगमनेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अंमलदार व तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे