अहमदनगर दि. 1 ऑगस्ट (प्रतिनिधी ) जन सामान्यांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे मी पारनेर विधानसभा मतदार संघाची निवडणूक लडविणार असल्याचे मत नगर तालुक्यातील खारेकर्जूने या पाच हजार लोक संख्येच्या गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लहानू देवराम बोरुडे यांनी देशस्तंभ न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.
घरची परिस्थिती अंत्यत बिकट असून देखील वडील दिवंगत देवराम नामदेव बोरुडे यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे, ते गावातील समाज कार्यात नेहमी अग्रेसर असायचे त्यामुळेच ते ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ शकले, त्यांचाच वारसा गिरवत जेमतेम 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेले लहानू बोरुडे हे गावातील कोणाच्याही सुख दुःखात, तसेच सामाजिक अग्रेसर असल्यामुळे त्यांचे गावातील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, लोकांची सेवा करण्याची त्यांची प्रबळ इच्छा असल्यामुळे मी पारनेर विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याचे त्यांनी व्यक्त केले, ते पुढे म्हणाले, गावात शबरी आवास योजनेची कामे, रमाई आवास योजना, गावातील रस्त्याचे काँक्रेटकरण, गावात हायमेक्स आदी कामे केली आहेत. पारनेर तालुक्याचा साडे चार वर्षात विकास झाला नाही, म्हूणनच उमेदवारी करणार असून सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडवून दुष्काळग्रस्त असलेला पारनेर तालुकाच नव्हे तर मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सातत्याने करून नगर पारनेर मतदार संघातील महिला बचत गटाला रोजगार मिळवून देण्याची माझी प्रामाणिक इच्छा असून रस्ते शेतकऱ्यांच्या मालाला मिळण्यासाठी लढा देत राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी पारनेर मतदार संघातील मतदारांनी मला आशीर्वाद दयावेत असे आवाहनही त्यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा