पाडळी सोसायटीत विक्रमसिंह कळमकरांचे निर्विवाद वर्चस्व.* ◆ग्रामपंचायत पाठोपाठ सोसायटीतही एकहाती सत्ता काबीज

पारनेर- दि.९ जून (प्रतिनिधी)
पाडळी रांजणगाव सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिहं कळमकर व पाडळी रांजणगावचे उपसरपंच डी बी आण्णा करंजुले यांच्या सत्ताधारी ग्रामविकास मंडळाला १२ जागा मिळाल्या तर विरोधी परिवर्तन मंडळाला अवघी १ जागा मिळाली.
पाडळी येथील सेवा संस्थेत सरपंच विक्रमसिहं कळमकर व पाडळी रांजणगावचे उपसरपंच डी बी आण्णा करंजुले यांच्या सत्ताधारी ग्रामविकास मंडळाने मागील ५ वर्षात सोसायटीच्या माध्यमातून कोणतेही राजकारण न करता चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळेच मोठ्या मताधिक्याने १२ उमेदवार विजयी केले आहे.आम्ही जनतेची कामे करतो आपलं काम बोलतंय म्हणूनच अनेकांच्या पोटात दुखतंय. विरोधकांकडून सर्व सामान्य माणूस उमेदवारी करीना म्हणून तीन माजी सरपंच उभे राहिले पण ते कर्तृत्व शून्य असल्याने सभासदांनी त्यांचा दारुण पराभाव करत सुफडा साफ केला.निवडणूकित विरोधकांनी पोरकट,बेताल आरोप करत भ्रष्ट कारभाराच्या वावड्या उठवत पोरकटपणा केला पण जनतेने परत आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सत्ता दिली आहे. त्यामुळे विरोधकांचे सत्तेचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. राजकीय पदाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन ते सोडविले पाहिजे. राजकारणाबरोबरच समाजकारण केल्यास यश मिळत असल्याचे या निकाला वरून स्पष्ट झाले.
◆ विजय उमेदवार ग्रामविकास पॅनल-
आप्पासाहेब कळमकर,एकनाथ साठे,आप्पासाहेब साठे ,सुदाम साठे,देवराम करंजुले,गणेश कळमकर, संभाजी करंजुले, गणेश करंजुले,कांतीलाल उबाळे,भगवान उघडे, वामन जाधव,नंदाबाई कळमकर,
•परिवर्तन पॅनल•- साधना करंजुले.
*■ ..हा तर कामाचा विजय!*
राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष विक्रमसिहं कळमकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व तरुण अत्यंत चांगल्या पद्धतीनेपाडळी,कळमकरवाडी गावात काम करत आहोत. प्रत्येक गावकरी, कष्टकरी सभासदांच्या विश्वासास पात्र राहत असल्याने सलग तिसऱ्यादां सभासदांनीं मला सोसायटीत नेतृत्व करण्याची संधी दिली.
डी बी (अण्णा) करंजुले- ग्रामविकास पॅनल प्रमुख