अहमदनगर दि. 4 मे (प्रतिनिधी ) अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय (आठवले ), शिवसेना (शिंदे गट ), पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( कवाडे ) गट महायुतीचे
अधिकृत उमेदवार खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी सक्रिय सहभागी होत असून नगर शहर व नगर तालुका परिसरातून प्रचार करीत आहेत.
शेवगाव तालुक्यात नुकतीच महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारानिम्मित बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, जिल्हा सपंर्क प्रमुख नितीन कसबेकर, जिल्हा सरचिटणीस महेश भोसले, अनिकेत विधाते शेवगाव तालुका अध्यक्ष संजय उनव्हणे, तालुका उपाध्यक्ष कोंडीबा मगरे, ज्ञानेश्वर मेहेत्रे, गणेश मेहेत्रे, बाळासाहेब मेहेत्रे, आसाराम काथवटे,प्रवीण भाडाईत, दिगम्बर काथवटे, सय्यद ईसाक, सय्यद आसिफ, आदर्श बनसोडे, प्रथमेश धालवडे, महेश कोरडे, नवनाथ कोरडे, दिगम्बर कोरडे, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा