नेवासा तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री करणारे 10 व्यावसायिकाविरूध्द धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

अहिल्यानगर दि. 18 ऑक्टोबर (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे अशांचे पथक तयार करून नेवासा तालुक्यामधील विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 16/10/2024 रोजी एकुण 9 गुन्हे दाखल करुन 10 आरोपींचे ताब्यातुन 81,870/- रुपये किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू, रसायन व देशी विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई चालु राहणार आहे.
पोलीस स्टेशन निहाय अवैध दारु विक्री करणारे इसमांविरुध्द करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे.
अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम जप्त मुद्देमाल किंमत आरोपी संख्या
1 सोनई 423/2024 म.दा.का.क. 65 (ई) 4000 1
2 सोनई 424/2024 म.दा.का.क. 65 (ई) 5000 1
3 सोनई 425/2024 म.दा.का.क. 65 (ई) 20000 1
4 सोनई 426/2024 म.दा.का.क. 65 (ई) 26000 1
5 सोनई 427/2024 म.दा.का.क. 65 (ई) 10000 1
6 सोनई 428/2024 म.दा.का.क. 65 (ई) 8000 1
7 नेवासा 926/2024 म.दा.का.क. 65 (ई) 3430 2
8 नेवासा 928/2024 म.दा.का.क. 65 (ई) 980 1
9 नेवासा 929/2024 म.दा.का.क. 65 (ई) 4460 1
एकुण 9 गुन्हे दाखल 81,870 10
सदर कारवाई मा.श्री. राकेश ओला साहेब,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, व मा.श्री.सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.