दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अजय काळे यास अटक,गुन्ह्यातील 40 हजार किमतीची मोटर सायकल जप्त,नगर तालुका पोलिसांची कामगिरी

नगर (प्रतिनिधी)
दिनांक 20/07/21 रोजी नगर तालुका पोलिस ठाणे हद्दी मधील घोस पुरी शिवारात चंद्रपूर येथील मिलिंद कान्हाजी काशिदे व त्याचा भाऊ याना बोलावून घेऊन त्यांच्यावर धाडसी दरोडा टाकून त्यांचेकडील 8 लाख 34 हजार किमतीचा मुद्देमाल काढून घेण्यात आला होता, त्याबाबत नगर तालुका पोलिस ठाणे येथे गु र न 414/21 ipc 395,397, 120ब प्रमाणे गुन्हा दाखल होता,सदर गुन्हा घडलेपासून दरोडेखोर अजय गजानन काळे हा फरार होता, त्यास काल रात्री स पो नि राजेंद्र सानप याना सदर आरोपी बुरुड गाव म्हात्रे मळा येथे आल्याची माहिती मिळाले नंतर त्यांनी पथकासह जाऊन सापळा लावून त्याच्याकडील गुन्ह्यात वापरलेल्या 40 हजार किमतीच्या मोटर सायकल सह ताब्यात घेण्यात आले आहे.सदर आरोपीस आज रोजी मा. न्यायालयात हजर केले असता त्यास 29/08/22पावेतो पोलीस कस्टडी मिळाली आहे,सदर गुन्ह्यातील एकूण 08 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
*सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक मनोज पाटील सो, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सो,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली स पो नि राजेंद्र सानप, पोसई रंजित मारग, पोहेकॉ धर्मराज पालवे, देवा काळे,पोना योगेश ठानगे,सोमनाथ घावटे व नगर तालुका पो ठाणेचे होमगार्ड यांनी केलेली आहे.