सामाजिक

लोकवर्गणी करून शहरातील खड्डे बुजविणार- विनोद गायकवाड महापालिका व स्थानिक नगरसेवकांचा नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अहमदनगर शहराला खड्ड्याची ओळख असल्याने सेल्फी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराची नव्याने झालेली ओळख म्हणजे खड्डे मय शहर असून या ओळखीमुळे वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी खड्ड्याच्या ठिकाणी थांबून सेल्फी घेतली व स्वतः लोकवर्गणी करून शहरातील खड्डे बुजवणार व महापालिका व स्थानिक नगरसेवकांचा नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत. लोकवर्गणीतून शहरातील ठीकठिकाणचे सर्व रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवण्यात येणार तसेच अनेक दिवसापासून मोठे खड्डे असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत असून अनेक महिला व जेष्ठ नागरिकांना या खड्डेमुळे रस्त्यामुळे दुखापत झालेली आहे. व पावसाळा सुरू झाल्याने अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून महापालिकेकडे अनेक वेळा तक्रार अर्ज करण्यात आले मात्र महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत लवकरात लवकर शहरातील रस्ते लोक वर्गणीतून बनवण्यात येणार असल्याचे विनोद गायकवाड म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे