कौतुकास्पद

वनकुट्यात एकाच वेळी साजरे केले १५१ जणांचे वाढदिवस ! वनकुट्याचे सरपंच अ‍ॅड.राहुल झावरे यांचा विक्रम !

अनोख्या वाढदिवसामुळे ज्येष्ठ सुखावले !

पारनेर दि.३ जून (प्रतिनिधी) :
दि.१ जुन ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त ज्येष्ठ मंडळींच्या वाढदिवसाची तारीख. शाळेत नाव दाखल करताना शिक्षकांनी शासनाच्या चौकटीत विद्यार्थ्याचे वय बसावे म्हणून नोंदविलेली ही तारीख. पुढे हीच तारीख त्या व्यक्तीच्या जन्मदिनाची तारीख निश्‍चित झाली. त्यामुळे १ जुन रोजी लाखो नागरिकांचे वाढदिवस साजरे होताना दिसतात. वनकुटे व परिसरातील अशा तब्बल १५१ ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस त्यांना फेटे बांधून, केक कापून समारंभपूर्वक साजरे करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.
सोशल मिडियामुळे वाढदिवस धडाक्यात साजरे करण्याचे फॅड गेल्या काही वर्षात वाढले आहे. १ जुन ही जन्मतारीख असलेल्या ज्येष्ठांचे वाढदिवस आजवर बहुदा साजरेही झाले झाले नाहीत. अशाच ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करण्याचा निर्धार सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी केला. त्यासाठी एक उत्सवच साजरा करण्याचे त्यांनी नियोजन केले. ग्रामपंचायत कार्यालयासामोर त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येउन पुरूष व महिलांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यात आले. त्यांच्या परिवारातील सदस्यांनाही त्यासाठी विशेष आमंत्रीत करण्यात येउन मिष्ठान्न भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. मनोरंजनासाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने ज्येष्ठांच्या वाढदिवाचा आनंद व्दिगुणीत झाला.
सुरूवातीस सर्व पुरूष तसेच महिलांना फेटे बांधण्यात येऊन केक कापण्यात आले. यावेळी शेतकरी बांधव असलेले, किंवा अशा पध्दतीने वाढदिवस साजरा न झालेले ज्येष्ठ नागरिक या सोहळयामुळे भाराऊन गेल्याचे पहावयास मिळाले. हा दिवस आम्ही विसरू शकत नाहीत अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. विशेष म्हणजे या उत्सवात महिलांची संख्याही लक्षणीय होती. निवृत्त शिक्षक, शासकिय कर्मचायांनीही या वाढदिवसाचा मनमुराद आनंद घेतला. सुरेश सिताराम गागरे, सदाशिव पंढरीनाथ वालझाडे, भिमराज मोहन मुसळे, भागा नाथा काळे, संतोष धोंडीबा डुकरे, संजय पंढरीनाथ औटी, बाळू यादव रांधवन, सुभाष तुकाराम खामकर, अजित चंद्रभान गागरे, संतोष नायकू केसरक, चंद्रकला माणिक वाबळे हे ज्येष्ठ नागरीक यावेळी उपस्थित होते.

▪️सरपंच झावरे यांचे हटके नियोजन
नेहमीच वेगळे आयोजन करून चर्चेत राहिलेल्या सरपंच अ‍ॅड. राहूल झावरे यांच्या या सामुदायीक वाढदिवसाचीही तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील पहिली ग्रामसभा बोलवून विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचा विषय असो की गावात कोरोना लसीकरणाचा पहिला कॅम्प आयोजनचा राज्यातील पहिला प्रयोग असो अ‍ॅड. झावरे यांच्या उपक्रमांची नेहमीच चर्चा झाली आहे. गावातील यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला राज्यपातळवरील कुस्त्यांंचा आखाडाही राज्यात चर्चिला गेला. आता १५१ नागरिकांचे वाढदिवस साजरे करून अ‍ॅड. झावरे यांनी आपले वेगळेपण पुन्हा सिध्द केेले आहे.

######
आ. लंके यांचे गाणे आणि प्रतिसाद!
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमात आमदार नीलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामावर अधारीत गाणे गायले गेले. त्या गाण्यास उपस्थितांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे