राजकिय

राष्ट्रवादी बळकट करणासाठी गाव तिथे शाखा उद्घाटन करण्याचा निर्धार!

राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी - घनश्याम शेलार

राष्ट्रवादी बळकट करणासाठी गाव तिथे शाखा उद्घाटन करण्याचा निर्धार! राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी – घनश्याम अण्णा शेलार. अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शेकडो युवकांचा जाहीर प्रवेश राष्ट्रवादी भवन येथे देशाचे नेते.शरदचंद्र पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मा.प्रकाशभाऊ पोटे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेशाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार यांच्या उपस्थितीत युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन स्वागत केले यावेळी उपप्रदेशाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रकाशभाऊ पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किसनराव लोटके, पक्ष निरीक्षक सीताराम काकडे, उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, तालुका अध्यक्ष उद्धवराव दुसुंगे, केशव तात्या बेरड, रोहिदास पाटील कर्डीले, कामगार आघाडीचे अध्यक्ष गजानन भांडवलकर,बाबासाहेब सोनवणे,शरद पवार, पापामिया पटेल,शहाबाज शेख,गौरव नरवडे,बंटी भिंगारदिवे,प्रमोड डाके, राहुल शेंडगे,शशिकांत उमाप, शिवम छजलाने, शंकर नवगिरे,पवन डहाणे, अक्षय बेरड,करण छजलाने,आप्पासाहेब केदारे,सामाजिक कार्यकर्ते संतोष आव्हाड,गणेश गारूडकर,संतोष उदमले, बाळासाहेब केदारे, राजहंस साठे,आकाश पोटे,अक्षय बेरड,विकी भिंगारदिवे,संजय डहाने, प्रवीण राऊत आदींसह मोठ्या संख्येने युवकांनी प्रवेश केला. या वेळी घनश्यामआण्णा शेलार म्हणाले की युवकांना राष्ट्रवादी पक्षात सन्मानासह काम करण्याची संधी मिळत असल्याने युवा वर्ग राष्ट्रवादीशी जोडला जात आहे.समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचा नेहमीच पुढाकार राहिला असून विकासासाठी राष्ट्रवादी कटीबद्ध असून,यासाठी कार्य करीत आहे.सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत असल्याने पक्षात काम करताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यां मध्ये एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे सांगून, संघटन कौशल्य,संघटन महत्त्व, तसेच देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे बद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रकाशभाऊ पोटे म्हणाले की मोठा युवक वर्ग राष्ट्रवादीशी जोडला गेला आहे,पक्षाचे ध्येयधोरण सर्वसामान्यांपर्यंत पोचून पक्ष बळकटीकरणासाठी गाव तिथे शाखा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे