गुन्हेगारी
नगर शहर गुन्हेगारी मुक्त करा : उद्धव शिंदे
स्नेहबंध'च्या वतीने नगर शहराचे उपअधीक्षक कातकाडे यांचा सत्कार

नगर शहर गुन्हेगारी मुक्त करा : उद्धव शिंदे
‘स्नेहबंध’च्या वतीने नगर शहराचे उपअधीक्षक कातकाडे यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) नगर शहराचे उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी नगर शहरातील गुन्हेगारीला आळा घालावा व नगर शहर गुन्हेगारी मुक्त करावे, असे प्रतिपादन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
नगर शहराचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या त्यांच्या जागी उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी स्वागत करून सत्कार करण्यात केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी उपस्थित होत्या.