कौतुकास्पद

बन्सी महाराज मिठाईवाले यांचेवर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद आरोपींकडुन मागील वर्षभरामध्ये शहरातील 7 व्यापाऱ्यांना लुटल्याची कबुली

अहमदनगर दि. 18फेब्रुवारी (प्रतिनिधी )
दिनांक 10/02/2024 रोजी धिरज मदनलाल जोशी वय – 54 वर्षे, व्यवसाय – मिठाई दुकान, रा. किर्लोस्कर कॉलनी, गुलमोहोर रोड, अहमदनगर हे त्यांचे रामचंद्र खुंट येथील बन्सी महाराज मिठाई नावाचे दुकान बंद करुन घरी जात असतांना रात्री 10.00 वा. चे सुमारास त्यांचे घराजवळ दोन इसमांनी मोटारसायकलवर येवुन त्यांचेवर तलवारीने प्राणघातक हल्ला करुन पळुन गेले होते. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 146/2024 भादवि कलम 307, 504, 34 सह आर्म ऍ़क्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व व्यापारी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनाठिकाणी मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, पोनि श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी गुन्हा ठिकाणी भेट दिली होती. भेट दिल्यानंतर सदरची घटना ही जबरी चोरीच्या उद्देशाने झाली असल्याची शक्यता होती व यापुर्वीही अहमदनगर शहरामध्ये व्यापारी यांना मारहाण करुन त्यांचेकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिणे चोरीच्या घटना घडलेल्या असल्याने श्री राकेश ओला साहेब यांनी पोनि श्री दिनेश आहेर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, सोपान गोरे तसेच पोलीस अंमलदार संदीप पवार, रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, फुरकान शेख, विशाल दळवी, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, प्रमोद जाधव, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, रणजित जाधव, संतोष खैरे, रोहित मिसाळ, संभाजी कोतकर, अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन आरोपीची माहिती काढणेकामी पथकास सुचना देवुन पथक रवाना केले.
वरील पथकाने अहमदनगर शहर व आसपासचे परिसरातील गुन्हा घडलेपासुन जवळपास 250 ते 300 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासुन आरोपींचा येण्याचा व जाण्याचा मार्ग निश्चीत केला होता. त्या आधारे तांत्रिक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा हा आरोपी नामे सुनिल जाधव रा. प्रेमदान हाडको याने त्याचे साथीदारासोबत केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीचा शोध घेता तो पुणे येथे गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने पुणे येथे जावुन 03 दिवस आरोपीची माहिती काढली असता तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता. आज रोजी सदरचा आरोपी हा पुणे येथुन प्रेमदान हाडके, अहमदनगर येथे त्याचे साथीदारांसोबत पुन्हा गुन्हा करणेकामी रात्री 02.00 वा. चे वेळी आला असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ प्रेमदान हाडको परिसरामध्ये सापळा रचला असता तेथे दोन मोटारसायकलवर चार इसम संशयीत रित्या उभे असल्याचे दिसुन आले. पथकाने सदर इसमांना सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले.
मिळुन आलेले इसम नामे 1) सुनिल भानुदास जाधव वय 23 वर्षे, रा. घोणसे क्लासजवळ, प्रेमदान हाडको, सावेडी, अहमदनगर, 2) महेंद्र लक्ष्मण धायगुडे वय 20 वर्षे, रा. भरतगांव, ता. दौंड, जि. पुणे, 3) अजय अशोक चव्हाण वय – 32 वर्षे, रा. सिध्दार्थनगर, अहमदनगर, 4) रजनीकांत संजय गरुड वय 28 वर्षे, रा. नागापुर एम.आय.डी.सी., अहमदनगर यांचेकडे अधिक सखोल चौकशी करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे 5) रोहित मनिष पवार रा. भिस्तबाग चौक, अहमदनगर, 6) अक्षय धनवे रा. प्रेमदान हाडको, अहमदनगर (फरार) यांचेसह अहमदनगर शहरामध्ये यापुर्वी देखील गुन्हे केल्याचे सांगुन चोरीचे गुन्ह्यातील सोन्याचे काही दागिने हे 7) रमन सुदर्शन मुड्डुपल्ली वय 52 वर्षे, रा. भापकर किराणा दुकानमागे, प्रेमदान हाडको, अहमदनगर यास विकल्याचे सांगितल्याने त्यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींचा साथीदार रोहित मनिष पवार यास शिरुर जि. पुणे येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडुन 5 तोळे वजनाची सोन्याची चैन, चाकु, बेस बॉल दांडा, 02 मोटारसायकल, मोबाईल असा एकुण 5,65,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपींना पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडुन अहमदनगर शहरातील खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 तोफखाना 17/2023 भादवि कलम 392, 504, 34
2 तोफखाना 377/2023 भादवि कलम 392, 34
3 तोफखाना 1021/2023 भादवि कलम 394, 34
4 तोफखाना 1076/2023 भादवि कलम 392, 341, 506, 34
5 एम.आय.डी.सी. 1041/2023 भादवि कलम 394, 34
6 तोफखाना 1799/2023 भादवि कलम 392, 341, 34
7 तोफखाना 146/2024 भादवि क. 307, 504
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे विचारपुस करता आरोपी हे शहरातील व्यापाऱ्यांना हेरुन त्यांचा दिवसभराचा व्यवहार झालेनंतर घरी जातांना ज्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. नसतील असे ठिकाण निश्चीत करत होते व प्रत्येक आरोपीवर लोकेशन देण्यापासुन ते घटना पुर्ण होईपावेतो वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली होती. तसेच आरोपी हे ओळख पटु नये याकरीताते हुडी असलेले जर्कीनचा वापर करत होते.
बन्सी महाराज मिठाईवाले यांचेवर हल्ला झालेनंतर विविध संघटनांनी पोलीस अधीक्षक साहेब, अहमदगर यांना निवेदन देवुन बन्सी महाराज यांचेवर झालेला हल्ला हा नियोजीत असल्याची शंका व्यक्त केली होती. परंतु नमुद आरोपींनी लुटण्यापुरताच हल्ला केल्याचे दिसुन आले आहे. तरी सर्व व्यापाऱ्यांनी सायंकाळी घरी जातांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन अहमदनगर पोलीसांतर्फे करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे