शिंदे आता सामाजिक क्षेत्रातील डॉक्टर : आमदार जगताप स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांचा डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सन्मान

अहमदनगर – स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण या क्षेत्रात नि:स्वार्थ भावनेने काम करून नगरचे नाव मोठे केले आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना मानद डॉक्टरेट मिळाली. त्यामुळे शिंदे हे आता सामाजिक क्षेत्रातील डॉक्टर बनले आहेत, असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी काढले.
इन्स्टिटयूट ऑफ एन्टरप्रिन्यूरशिप अँड मॅनॅजमेन्ट स्टडीज ऑटोनॉम्स व्हर्चुअल मोड युनिव्हर्सिटी यांच्याकडून स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांना मुंबईत मानद डॉक्टरेट प्रदान करून सन्मान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांचा आमदार जगताप यांनी सत्कार केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष रेश्मा आठरे, राष्ट्रवादी ओबीसी सेल अमित खामकर, राष्ट्रवादी युवकचे केतन क्षिरसागर, युवती अध्यक्षा अंजली आव्हाड, कामगार सेलचे गजानन भांडवकर, सामाजिक न्याय महिला अध्यक्ष साधना बोरुडे, भिंगार अध्यक्ष संजय सपकाळ, कैलास मोहिते, संभाजी भिंगारदिवे, जेव्हीअर भिंगारदिवे, नाथा राऊत, मतीन सय्यद, दीपक लिपाणे, कल्पेश तोतरे, विशाल बेलपवार, अजिंक्य भिंगारदिवे, दिनेश लंगोटे, अक्षय बोरुडे, राहुल अमृत, सुदाम गांधले, ईश्वर बेरड, विनोद साळवे आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, शैक्षणिक, सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे उद्धव शिंदे यांना नुकतीच मानाची मानद डॉक्टरेट पदवी मिळाली.
समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण काही तरी केलं पाहिजे. दिवसभरात आपण समाजासाठी काय केलं याचं रोज आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, या भावनेतूनच डॉक्टर शिंदे हे कार्य करत आहेत त्यांच्या या कार्याचे दखल घेत त्यांना डॉक्टरेट मिळाली.
प्रा. माणिकराव विधाते म्हणाले, डॉ. शिंदे सामाजिक क्षेत्रातील काम मोठे आहे. त्यांच्या कामाची राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांनी दखल घेत पुरस्कार देऊन गौरवले आहे. डॉ. शिंदे यांना सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी मानद डॉक्टररेट या सन्मानामुळं आणखी प्रेरणा मिळणार आहे.