उपनगरातील वाढत्या वसाहतींना पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – महापौर रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर (प्रतिनिधी)- उपनगरे हे शहराचे वैभव असतात. ज्या शहरांत उपनगरांमध्ये नागरी वसाहती वाढत जातात, ती शहरे विकासाकडे वाटचाल करतात. नगर शहराची केडगाव व सावेडी ही दोन प्रमुख उपनगरे असून, येथे आता नागरी वसाहतींत झपाट्याने वाढ होत आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. अशा वसाहतींत आमचे लोकप्रतिनिधी संपर्क करून तेथील समस्या जाणून घेतात. समस्यांचा वेध घेऊन ज्या ठिकाणी गरज आहे, तेथे निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा करतात. त्यामुळे समस्या मार्गी लागतात. केडगाव उपनगरात नागरी वसाहतींत वाढ होत असून, येथे शिवसेना पायाभूत सुविधा कमी पडून देणार नाही, तर त्याची उणीव देखील नागरिकांना भासू देणार नाही, असे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले.
केडगावमधील मोतीनगर येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. या कामाचा शुभारंभ महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. कार्यक्रमास नगरसेविका शांताबाई शिंदे, अनिता पवार, विमल गायकवाड, पुष्पा दिवटे, योगीता दिवटे, गायत्री गायकवाड, नंदा धोत्रे, सोनम सातपुते, शकुंतला भोसले, समीक्षा दिवटे, बबलू शिंदे, हितेश धाडगे, सुशांत दिवटे, रवी टकले, सचिन दारकुंडे, बाळासाहेब कोतकर, सचिन घेंबूड, सुरज भोसले, अजित पवार, सोनू हजारे, विकी शिंदे, सिकंदर शेख, दीपक दिवटे, सागर भालसिंग, अनिल सूर्यवंशी, रोहित रासकर, मयूर जाधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. शेंडगे पुढे म्हणाल्या की, उपनगरातील आमच्या लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी सुचवलेली कामे टप्प्याटप्प्याने उपलब्ध निधीनुसार मार्गी लावण्यात येत आहेत. नागरिकांनी समस्या लोकप्रतिनिधींकडे मांडाव्यात. त्या तत्काळ मार्गी लावल्या जातील. जनतेला पायाभूत सुविधा पुरविण्यास शिवसेना सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका शांताबाई शिंदे म्हणाल्या की, शिवसेना पक्ष आम्हा लोकप्रतिनिधींच्या मागे सक्षमपणे उभा आहे. त्यामुळे विकासकामांतील अडथळे दूर होऊन कामांना मंजुरी मिळते आहे. महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या सहकार्याने माझ्या प्रभागातील विकासकामांना आता गती मिळाली आहे. दर्जेदार विकासकामांतून प्रभागाचा चेहरामोहरा बदलत आहोत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता पवार यांनी केले, तर आभार पुष्पा दिवटे यांनी मानले.



