ब्रेकिंग

घातक हत्याराने दरोडा, जबरी चोरी करणारी शिर्डी येथील गुन्हेगारांची टोळी दोन वर्षाकरीता केले हद्यपार- जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा शिर्डीतील टोळीला दणका

अहमदनगर दि.२ ( प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांचे आदेश.. प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, हद्दपार करण्यात आलेल्या टोळीतील टोळी प्रमुख अ.नं. १) राजु उर्फ शाक्या अशोक
माळी, रा. गणेशवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर व टोळी सदस्य अ.नं. २) किरण ज्ञानदेव सदाफुले, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. जि. अहमदनगर यांनी एक टोळी तयार करुन त्यांचे टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशन राहाता, हरित व आसपासचे परिसरात घातक हत्यारासह दारोडा टाकणे, चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, चोरी करणे असे ५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे करुन परिसरातील सर्वसामान्य नागरीकांमध्ये टोळीची कायमस्वरुपी दहशत राहण्यासाठी सराईतपणे गुन्हे केलेले होते. व सदर टोळीची दिवसेंदिवस गुंडगिरी व गुन्हेगारीवृत्ती वाढतच चालली होती. टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचे गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध होण्यासाठी त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून व प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचे वर्तनात सुधारणा होत नव्हती. टोळीच्या कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये भय व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्हयांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरीक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते. सदर टोळीकडून भविष्यात
गंभीर स्वरुपाचे शरिराविरुध्द तसेच मालाविरुध्दचे गुन्हे घडणार असल्याने संपुर्ण टोळीची पांगापांग करुन हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नाही. शिर्डी पोलीस स्टेशन व राहाता तालुका परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे सुरक्षिततेसाठी तसेच टोळीची नागरीकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी टोळीचे टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार कारवाई होऊन अहमदनगर जिल्हा हद्दीतून तसेच नाशिक जिल्यातील येवला तालुका तसेच औरंगाबाद जिल्हयातील वैजापुर तालुक्यातुन दोन वर्षाकरीता हडपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक, शिर्डी पोलीस स्टेशन यांनी या प्राधिकरणाकडे सादर केला होता.
सदर प्रस्तावाची चौकशी करुन पोलीस अधीक्षक यांनी टोळी प्रमुख अ.नं. १) राजु उर्फ शाक्या अशोक माळी,
रा. गणेशवाडी शिडी, ता. राहाता, जि. अहमदनगर व टोळी सदस्य अ.नं. २) किरण ज्ञानदेव सदाफुले, रा. श्रीरामनगर शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर यांना २ वर्षाकरीता अहमदनगर जिल्हयातुन हद्यपार केले आहे. यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. पो. स्टे.
१कलम
४०३ / २०२१ भादंवि कलम ३९५, ३९४,३९२, ३२३, २०१ प्रमाणे शिर्डी ३०६/२०२९ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
५९८/२०२१ भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे९८७/२०१९ भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे
५ शिडी ०८/२०१८ भादंवि कलम ३९४,३४ प्रमाणे वरील प्रमाणे संघटीतपणे गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्यासाठी अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या टोळी विरुद्ध माहिती संकलीत करुन विविध गुन्हेगारी टोळयांविरुध्द हद्यपारीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संकेत मा.श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, तथा हद्दपार प्राधिकरण अहमदनगर यांनी दिलेले आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे