जामखेड तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीचे शिक्षकांचे कामकाज कौतुकास्पद :- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

जामखेड दि. २९ जुलै (प्रतिनिधी) :- जामखेड तालुक्यातील शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख हे शाळेत विविध उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत असल्यामुळे त्यांचे कामकाज जामखेड तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रति मत जामखेड तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे यांनी जामखेड, खर्डा,नान्नज, येथील आयोजित शिक्षण परिषदेत व्यक्त केले.
जामखेड तालुक्याचे गुणवत्ता अतिशय चांगली असून शिक्षक मेहनतीने काम करीत आहेत विद्याजन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे त्यांचे बंधू अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभवताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार नीती मूल्य सकारात्मक दृष्टी यांची सुंदर नक्षी उभारावयाची आहे. त्यातून उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य उन्नत होणार आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण व सुप्त गुण हेरून त्यांच्यां व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावयाचा असतो, शिक्षकांनी गती ओतून काम केल्यावर विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकतात त्याचे मानसिक समाधान खुद मोठे असल्याचे ते म्हणाले.
अलीकडील काळात जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेतात. शासन मोफत शिक्षण, गणवेश, पाठ्यपुस्तके इत्यादी अनेक योजना राबवीत असून या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते त्यामुळे जामखेड तालुक्यात चांगली शैक्षणिक प्रगती झाली असून त्याचे सर्व श्रेय शिक्षक घेत असलेली मेहनत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गणपत चव्हाण, शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, केंद्रप्रमुख राम निकम, नारायण राऊत, सुरेश मोहिते, मल्हारी पारखे, संजय घोडके, संतोष वानरे, केराव गायकवाड, बाळासाहेब कुमटकर, श्री त्रंबके आदी मान्यवर उपस्थित होते.