मोहटादेवी गडावर चौथ्या माळेस सभापती सौ सुनिताताई गोकुळ दौंड यांच्या हस्ते महाआरती

पाथर्डी (प्रतिनिधी वजीर शेख)
पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर, सध्या नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो,या गडावर महाराष्ट्रभरातून लोक,पायी येतात नवसाला पावणारी मोहटादेवी जगभरात प्रसिद्ध आहे, नवरात्रात नऊ दिवस देवीची मूर्ती,पुजा आरती असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहटादेवी गडावर सध्या खुप गर्दी असते , देवस्थानच्या वतीने सर्व ठीक ठिकाणी रस्त्यावर वाहतूक व्यवस्था हि छान प्रकारे करण्यात आली आहे, तसेच पोलिस प्रशासन व पोलिस मित्र ची चोख बंदोबस्त ठेवला आहे, आशा नवरात्र उत्सव च्या चौथ्या माळेच्या दिवशी पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सौ सुनिताताई दौंड व गोकुळ भाऊ दौंड , यांना महाआरतीचा मान मिळाला, यावेळी गोकुळ भाऊ दौंड यांचे कडून देवस्थानचे सर्व विस्वस्थ व येणाऱ्या भाविकांचे आभार मानले