गौण खनिज करणाऱ्या माफियांवर कारवाई होण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानव विकास परिषदेच्या वतीने आमरण उपोषण तहसीलदार चंद्रे यांनी गौण खनिज माफिया यांना हाताशी धरून सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर दि. १० ऑगस्ट (प्रतिनिधी)- जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश शिवराम पवार यांनी अवैद्य गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. या कारणाचा मनात राग धरून जामखेड येथील तहसीलदार योगेश चंद्रे यांनी गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांसमवेत नियोजित कट रचून पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याची धमकी देत उच्च न्यायालयातील प्रकरण मागे घेण्याची धमकी दिली.
त्या निषेधार्थ त्यांच्यावर कारवाई करून गौण खनिज उत्खनन माफियांवर महसूल शाखेने केलेल्या दंडाची पूर्ण वसुली करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना मानव विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख समवेत सतीश पवार, कमलाकांत सरोदे, शिवराम पवार, सुनीता पवार, संगीता पवार, कृष्णाबाई शिंदे, साखरबाई लष्कर, शरद पवार आधी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की जामखेड येथील तहसीलदार योगेश चंद्रे यांचे महसूल गौण दंड रक्कम बुडवे खानमाफिया गुंडांसोबत मिली भगत असून तहसीलदार व खानमाफिया यांनी अवैद्य गैर मार्गाने गौण, दगड (डबर) खाणी खोदलेले सर्व फोटो व व्हिडिओ घेतल्याने सतीश पवार यांनी न्यायालयामध्ये फिर्यादी याचिका दाखल केली व महसूल अधिकारी कर्मचारी व तहसीलदार यांनी येथील गौण खनिज दंड रक्कम बुडवे खान माफिया गुंडांना हाताशी धरून नियोजित कट रचला व माझ्या डोक्याला बंदूक लावून पैसे व मोबाईल फोन घेऊन माझ्या शेत जमिनीतून मला अपहरण करून माझ्यावर प्राण घातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असून न्यायालयातील फिर्यादी याचिका माघारी घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. व गौण खनिज खान माफिया व जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे जबाबदार धरून गुन्हा दाखल करावा तसेच मोहा येथील बोरवेल ब्लास्टिंग अमोनियम वर कायम बंदी घालावी अमोनियम स्फोटक मुळे वायू प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.