नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे श्रीनिवास शिवरात्री सेवानिवृत्त!

अहमदनगर दि.३० (प्रतिनिधी) नॅशनल इन्शुरन्स कंपनी चे रेकॉर्ड क्लार्क श्रीनिवास शिवरात्री ३३ वर्ष केलेल्या प्रदीर्घ सेवनंतर काल २९ एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले.
नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून नुकताच त्यांच्या सेवा निवृत्तीचा कार्यक्रम कंपनीचे विभागीय मॅनेजर अजय गुंजाळकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला.यावेळी शिवरात्री तसेच त्यांच्या पत्नी मंगला शिवरात्री,मुलगा ऋषिकेश शिवरात्री यांना कंपनीकडून गणपतीची चांदीची मूर्ती भेट देत सन्मान करण्यात आला.यावेळी लाड साहेब यांनी शाल,श्रीफळ, पुषपगुच्छ देत शिवरात्री यांचा सपत्नीक सत्कार केला.तसेच झावरे साहेब यांनी शिवरात्री यांचा गांधी टोपी सन्मान केला. कंपनीकडून झालेल्या सेवा निवृत्ती कार्यक्रमाने शिवरात्री व त्यांचे कुटंबीय भारावून गेले होते.कंपनीच्या सेवेतून आपण निवृत्त झाल्याने श्रीनिवास शिवरात्री यांचे डोळे पाणावले होते.
या कार्यक्रमास लाड साहेब,गणेश थोरात साहेब,झावरे साहेब, सुपेकर साहेब नारायण साळवे,तुषार बोरा,
सुरेश भिंगारदिवे,मयूर गुगळे,गुरम्म मॅडम,भिंगारकर मॅडम आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन लाड साहेब यांनी केले.