जबाबदारी ला वय नसतं……

अहमदनगर (प्रतिनिधी)
संसाराचा गाडा ओढताना संसार हा एका दोघांचा नसतो हे दाखवून देणारा फोटो आहे. या मुलीला पाहून मला मुकेशजींचं एक गाणं आठवलं ” संसार है एक नदिया , दुख सुख दो किनारे है , नाजाने कहां जाएं हम बहते धारे है ! ” काल मित्रांसोबत तिरूपती बालाजी ला गेलो आणि दर्शनानंतर मंदिरासमोरील पटांगणात बसलो तेव्हा समोर एक कुटुंब येताना दिसलं .आई – वडील , जेमतेम ५/७ वर्षांची एक मुलगी आणि एक मुलगा , बाप बलाजीचे पेंडल असलेल्या चेना विकत होता , आई च्या हातात कडेवर एक लहान मुलगा आणि एका हातात विकण्यासाठी वेगवेगळे धागे होते आणि ही लहान मुलगी हातात २ छोट्या डब्या त्यात पांढरा आणि लाल गंध आणि हातात काडी घेऊन आलेल्या भक्तांना हा असा तिरूपती चा गंध लावत असे आणि पैसे न मागता भक्त देतील ते हसऱ्या चेहऱ्याने सुखी मनाने स्विकारायचे हे या मुलीचे काम. खरंतर हे वय काय अन ती करते काय हे पाहताना मन भरून आले की एवढी गोड मुलगी आज जग पाहण्याच्या आणि समजण्याच्या वेळेत कुटुंबाच्या जबाबदारीत खारीचा वाटा उचलू पाहात आहे हे खुप काही शिकवून गेली ,म्हणून म्हणालो जबाबदारी ला वय नसतं*. बलिदान , योगदान करण्याचे मिळालेले सामर्थ्य स्त्री ला जणू दैवी शक्तीच मिळालेली आहे. आजपर्यंत मी मुलींना संसारात सर्व काही सहन करताना पाहिले आणि ऐकले होते पण हे कुटुंबासाठी या वयात हातभार लावणं खुप प्रेरणादायी ठरलं . हालाखीची परिस्थिती पण अशा परिस्थितीत ती तिच्या सवंगड्या सवे खेळू शकली असती बागडू शकली असती पण तिने कुटूंबाला महत्व दिले. आणि ती जे काम करत होती ते अगदी मनापासून , कलाकुसरीने आणि व्यवस्थित होतं. तिला हे सगळं करताना पाहून न राहता त्या माऊली ला आवाज देऊन बोलावलं गंध लावला आणि हा फोटो काढला कारण जर सोबत फोटो काढला असता तर तिच्या मनात त्या कामा बद्दल वेगळा विचार येऊ शकला असता पण मला ते पटलं नाही.*मित्रांनो आयुष्यात कशाचीही लाज बाळगू नका जे काही करायचे आहे ते खूप मोकळ्या मनाने करा कारण आपल्या आनंदात आपल्या त्या कामातून दिसणाऱ्या वागणूकीत कोणी तरी प्रेरणा घेत असतं.
या माऊलीला मनापासून मुजरा ..
सुमित संतोष वर्मा
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, अंबिकानगर.