अल्प पोलीस अधिकारी ,कर्मचाऱ्यांवर चालतोय शहर पोलीस वाहतूक शाखेचा कारभार

अहमदनगर दि.६ सप्टेंबर (प्रतिनिधी) नगर शहरात कार्यरत असलेल्या शहर पोलीस वाहतूक शाखेचा कारभार अल्प पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावरच चालत असल्याची माहिती समोर आली आहे.
नगर शहरातील व बाहेरून येणाऱ्या वाहतुकीचा विचार करता वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी अल्प असणारी कर्मचारी संख्या ही निश्चितच पुरेशी नाहीच त्यामुळे ही बाब नेहमीच वाहतूक कोंडी बाबत चर्चा करणाऱ्या नागरिकांनीही लक्षात घेणे गरजेचे ठरते.पोलीस प्रशासनाने याबाबत कर्मचारी वाढविणे देखील महत्वाचे आहे.
*
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून माहिती घेतली असता एकूण ७४कर्मचारी शहर पोलीस वाहतूक शाखेला मंजूर आहेत परंतु प्रत्यक्ष हजर. ३ पोलीस उप निरीक्षक,३८ कर्मचारी दोन चालक जे पोईंटवर काम करू शकत नाहीत यामध्ये ८ ते१० कर्मचारी साप्ताहिक सुट्टी,सिक व इतर रजा आदींमुळे प्रत्यक्ष हजर नसतात म्हणजेच अवघे २५ ते २८ कर्मचारी रोज काम करतात .शहरातून दररोज ८ ते १० हजार वाहने ये,जा करतात. ही वाहने नियंत्रण करण्यासाठी कर्मचारी संख्या खूपच कमी आहे.
संख्या ७४ ऐवजी कमीत कमी निम्या कर्मचाऱ्यांवर आली तर वाहतुकीचे नियोजन अधिक चांगले करता येईल.
श्री.मोरेश्वर पेंदाम(पोलीस निरीक्षक शहर वाहतूकशाखा)