अहिल्यानगर दि. 6 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुती अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरातील आंबेडकरनगर चोभे कॉलनी येथे महिलांची बैठक घेण्यात आली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना सुरेशभाऊ बनसोडे म्हणाले महायुतीच्या सरकार मध्ये नोव्हेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिला माता, भगिनींच्या नाववर जमा झालेत, आता आचार संहिता संपल्यावर डिसेंबर महिण्याचेही पैसे जमा होतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणेच महिलांना प्राधान्य देत शहरात आमदार संग्राम जगताप यांनी होम मिनिस्टर, त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धेसारखे कार्यक्रम घेऊन महिला मधील कलागुणांना वाव देण्याचे काम केले.
सिमेंट काँक्रेटचे रस्ते बनविले, येथून पुढच्या काळात चोभे कॉलनीतील नागरिकांचा संबंध फक्त निवडणुकीपुरता निवडूनकीच्या नंतरही आपण जेष्ठ नेते सुनीलभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून संपर्कात राहून या भागातील सर्व अडचणी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असा शब्द या बैठकित देत, येणाऱ्या 20 नोव्हेंबर ला अनु. 4 व घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना जेष्ठ नेते सुनील शिंदे म्हणाले,सुरेशभाऊ बनसोडे यांनी आमची भेट अरुण काका जगताप यांच्याशी घालून दिली. त्याच वेळेस काकांना सांगितले कि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार शहरात देणार नाही. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आपण काम करणार असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच येणाऱ्या काही दिवसात एक महिला मेळावा आमदार जगताप यांच्या उपस्थित घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकित त्यांनी उपस्थित महिलांना आमदार संग्राम जगताप यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी महिलांनी संपूर्ण चोभे कॉलनी आमदार संग्राम जगताप यांनाच आपले अनमोल मत देऊन विजयी करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, राकेश पवार, प्रवीण शेख, सुनीता शिंदे, मंगल पाटोळे, जयनाबी सय्यद, चंद्रकला जाधव, बेबीताई टकले, जिजा गायकवाड, अलका गिते, मीना बोरसे, सविता काळे, संजवणी राजपूत, आशा पठारे, सुशीला दिवटे, उज्वला माळवे, मोनाली लवाडे,कोमल बंब, पार्वतीबाई आवटे, रेश्मा चव्हाण, सखुबाई गायकवाड, सायरा शेख, सुरेखा पवार, मनीषा चव्हाण, सुरेखा सोनवणे, रजिया पठाण, जया मोकळ, सुरेखा शिंदे, सोनाली खरपे, उज्वला शिंदे, पूजा साळवे, नेहा जावळे, शीतल घोरपडे, रमा गायकवाड, रजनी बोरुडे, अलका मैड, रंजना उरणकर, साखरबाई ढाकणे, निकिता शिंदे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा