राजकिय

काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी जरीवाला, सय्यद, सहसचिवपदी सावंत, तर सोशल मीडिया ब्लॉक अध्यक्षपदी पाटील यांची निवड भगत, शिंदे, झिंजे, चुडीवालांची शहर जिल्हा सरचिटणीस पदी वर्णी

अहमदनगर दि. २१ मार्च (प्रतिनिधी) : अहमदनगर शहर काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अलतमश जरीवाला, हाफिजुद्दीन सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. तर सहसचिव पदी राहुल सावंत यांना संधी देण्यात आली आहे. आर. आर. पाटील यांना शहर ब्लॉक सोशल मीडियाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, महिला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत यांना कार्यकारणीत सरचिटणीस पदावर स्थान देण्यात आले. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मान्यतेने या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
जरीवाला यांनी नुकताच काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला होता. त्यांचे अल्पसंख्यांक समाजासह सर्व समाज घटकांमध्ये मोठे संघटन आहे. विशेषतः युवा वर्गात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. हाफिजुद्दीन सय्यद हे सेवानिवृत्त मनपा अधिकारी आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करत सक्रियपणे काम सुरू केले आहे. दोघांवर पक्षाने शहर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवत अल्पसंख्यांक समाजामध्ये संघटन वाढीला चालना देण्याचे काम केले आहे.
राहुल सावंत यांना सहसचिव पदी संधी देत या निमित्ताने केडगावला शहराच्या कार्यकारणीत प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आर. आर. पाटील यांना शहर जिल्हा कार्यकारणीत सचिव पदावर स्थान देण्याबरोबरच सोशल मीडिया विभागाच्या नगर शहर ब्लॉक अध्यक्ष पदाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सोशल मीडियामध्ये जोरदार बाजू मांडत आले असून आता पक्षाने त्यांना महत्त्वाच्या पदावर संधी दिली आहे. महिला, अल्पसंख्यांक व ओबीसी काँग्रेस विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षांना कार्यकारीणीमध्ये सरचिटणीस म्हणून स्थान देण्यात आले आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, प्रदेश काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आ. लहू कानडे, जिल्ह्याचे निरीक्षक माजी आ.मोहन जोशी, प्रभारी वीरेंद्र किराड, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, अल्पसंख्यांक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, ओबीसी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते आदींनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे