मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला दरेवाडी गावातील घरकुल लाभार्थी मीराबाई मधुकर करांडे यांच्याशी संवाद!

दरेवाडी दि.१ जून (प्रतिनिधी)माऊली संकुल येथील सभागृहात केंद्र सरकार पुरस्कृत योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचे गरीब कल्याण योजना मेळावा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेण्यात आला. या मेळाव्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लाभार्थी सर्व शासकीय यंत्रणा उपस्थित होत्या यावेळी आपले मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी योजनेतील लाभार्थ्यांची संवाद साधला हा संवाद साधतांना दरेवाडी गावातील घरकुल लाभार्थी मीराबाई मधुकर करांडे यांना सर्वप्रथम संधी मिळाली. व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीदेखील आपुलकीने त्यांच्याशी संवाद साधला. तसेच केंद्रपूरस्कृत सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणाऱ्या शासकीय यंत्रणांचे आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्याशी थेट संभाषण केले. यावेळी त्यांनी मोठ्या आपुलकीने दरेवाडी गावाविषयी माहिती घेतली. याप्रसंगी दरेवाडी च्या सरपंच सौ स्वाती बेरड शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख आशाताई निंबाळकर सौ दीपमाला मच्छिंद्र बेरड सौ प्रियंका बेरड व ग्रामसेवक श्री संपत दातीर हे उपस्थित होते.