जिल्ह्यातील 2 अल्पवयीन मुलींना पळवुन नेणाऱ्या आरोपींना 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक

अहमदनगर दि. ६ (प्रतिनिधी )जिल्ह्यातील 2 अल्पवयीन मुलींना पळवुन नेणाऱ्या आरोपीला 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाला आहे.
राहुरी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन जातीवाचक शिवीगाळ केले बाबत दिनांक 4/8/23 रोजी राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 848/23 भादविक 354, 354 (ड), 506 सह पोक्सो का.क. 8, 12 व अजाजकाक. 3 (1) (आर), 3 (1) (डब्लु) (1) गुन्हा दाखल होता.
तसेच कोपरगांव येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी आरोपीने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेले बाबत दिनांक 5/8/23 रोजी कोपरगांव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 372/23 भादविक 363 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर दोन्ही घटना अत्यंत संवेदनशिल असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/ दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन पिडीत अल्पवयीन मुलीचा व वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/ दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/बबन मखरे, शरद बुधवंत, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, संदीप दरदंले, सचिन आडबल, फुरकान शेख, पोकॉ/बाळू खेडकर, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, मपोना/भाग्यश्री भिटे, मपोकॉ/ज्योती शिंदे, चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर व चापोकॉ/अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके नेमुण पिडीत अल्पवयीन मुलगी व दोन्ही आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.
पथक प्रथम राहुरी येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी शाहनवाज शेख याचा शोध घेत असताना तो बीड येथे असले बाबत माहिती मिळाल्याने पथकाने स्थागुशा बीड येथे नेमणुकीस असलेले पोना/मनोज वाघ यांना मदतीस घेवुन आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती प्राप्त करुन आरोपी 1) शाहनवाज असिफ शेख वय 21, रा. वांबोरी, ता. राहुरी हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील तपास कामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक कोपरगांव शहर येथे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी यांचा प्रथम पुणे, लोणावळा येथे शोध घेतला. परंतु ते नवी मुंबई येथील वाशी या ठिकाणी असले बाबत माहिती प्राप्त होताच पथकाने वाशी पोलीस स्टेशनचे पोसई/निलेश बारसे यांना मदतीस घेवुन पिडीत व आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती प्राप्त करुन पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी 1) तौफिक मिटु पठाण, रा. बोधेगांव, ता. शेवगांव हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर) डॉ. बसवराज शिवपुजे (उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग) , संदीप मिटके , (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग) यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.