सामाजिक

स्वराज्य संघटने च्या प्रथम वर्धापन दिनाची तयारी पुर्ण : कमलेश शेवाळे

अहमदनगर दि.२३ (प्रतिनिधी) समाजाची सेवा करण्याचे व्रत मनाशी बाळगून असलेल्या स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटने चा प्रथम वर्धापन दिन ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे महाराष्ट्र दिन या दिवशी ०१ मे २२ रोजी होत आहे. सतत सामाजिक कार्य आणि निराधारांना आधार याच धर्तीवर हि संघटना नावलौकिक मिळवत आहे. आज समाजामध्ये भरपूर संघटना सामाजिक कार्य करतात परंतु स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना हि नेहमीच व सातत्याने समाजाची सेवा व समाजाचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असते. वर्धापन दिनासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी वजीर शेख उपस्थित राहणार आहेत. या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने अहमदनगर शहराचे लोकप्रिय आमदार मा संग्रामभैय्या जगताप साहेब , व नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना.मा. प्राजक्तदादा तनपुरे साहेब तसेच सोलापूर शहराच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमामधे २०२१ उत्कृष्ट पदाधिकारी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख भरतजी नजन, आर आर जाधव काका, संतोष जावळे, सचिन दिघे, सचिन चांदघोडे, सोनाली कुसाळकर, सचिन पवार, संतोष आहेर, डॉ देवेंद्र शिंदे, योगेश सुराणा, सुरज दरक, दत्तात्रय पोपळघट, योगेश मंडलिक, राजश्री जोशी, मंगल वाणी, बाबासाहेब मंडलिक, प्रशांत जोशी, अमन चेडे, वैभव शहाणे, दिपक कदम, अमृता कोहक, बंडु दहातोंडे, गिते महाराज, रुकसाना शेख, नेवासा तालुकाध्यक्ष जावेदभाई सय्यद, जावेद शेख, राहुरी तालुकाध्यक्ष राहुल पवार आदी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम वजीर शेख घेत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे