टाकळी ढोकेश्वर गावाची बदनामी कराल तर याद राखा ! सरपंच सौ.अरुणा प्रदिप खिलारी

पारनेर दि.१० जून (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर गावास वाड्या-वस्त्यांवर जवळपास ७ कोटी रुपये विकास कामे प्रगतीपथावर असून आणि काम पूर्ण झालेले आहे. असे असतानाही विरोधकांनी ४० लाख रुपयांची विकासकामे अडविली असल्याचा आरोप सेवा संस्था निवडणूक डोळ्या समोर ठेवून केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये टक्केवारी घेणाऱ्यांनी ग्रामपंचायतीचा अपप्रचार अथवा बदनामी करू नये असा टोला सरपंच सौ अरुणा प्रदीप खिलारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. या प्रसिद्धी पत्रकावर उपसरपंच रामभाऊ तराळ माजी उपसरपंच सुनील चव्हाण ग्रामपंचायत सदस्य दत्ता निवडूंगे सुनीता झावरे सुग्रमी हवालदार प्रियंका बांडे गंगाधर निवडूंगे यांच्या सह्या आहेत जिल्हा परिषद मध्ये गेल्या चार महिन्यापासून प्रशासक असताना नारळ फोडण्याचा अधिकार सभापती काशिनाथ दाते यांना कोणी हा असा सवालही सरपंच सौ अरुणा खिलारी यांनी केला आहे.
टाकळीढोकेश्वर सारख्या मोठे गावची महिला सरपंच असल्याने जिल्हा परिषद मध्ये अनेक विकास कामे अडवण्याचा प्रयत्न सुद्धा विरोधकांकडून केला जातो परंतु आमदार निलेश लंके हे एक भावाप्रमाणे आमच्या पाठीशी उभे राहत असून गावासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत आहे.
तर टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीअंतर्गत बांडे मळ्याच्या रस्त्यासाठी कोणताही निधी अथवा प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही तसा आदेश अद्यापर्यंत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला नाही
.तर दुसरीकडे वडगाव रस्त्याचे ४०० मीटर काम स्वामी समर्थ सीडीवर्क ३९० मीटर काम मंजूर असताना त्याठिकाणी एक किलो मीटरचे काम मंजूर असल्याची टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे. वास्तविक या दोन्ही रस्त्यांची काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अर्धे काम करून टाकलं काय विकास करणार असा सवालही सरपंच सौ. अरुणा खिलारी यांनी केला आहे. वडगाव सावताळ ते टाकळीढोकेश्वर हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आमदार निलेश लंके घेतला असून या रस्त्यावर आपण फक्त ४०० मीटर साठी निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या रस्त्याचे काम ४०० मीटर म्हणजे किती होणार असा सवाल स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या कामाविषयी ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण करून मीटर मध्ये रस्ता मंजूर केला असताना किलोमीटरच्या बाता मारता हे टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे टीकासुद्धा सरपंच खिलारी यांनी केली आहे. त्यामुळे या विकास कामासाठी यापुढील काळात भरीव निधी उपलब्ध करून द्या आम्ही तुमच्या पुढे एक पाऊल पुढे येऊन विकासकामासाठी उभे राहू परंतु जनतेची दिशाभूल व टाकळी ढोकेश्वर गावची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपला हिशोब चुकता केला जाईल असा इशाराही सरपंच सौ अरुणा प्रदीप खिलारी यांनी दिला आहे.
#######*** बनाईवस्ती व बेट वस्तीच्या रस्त्यासाठी आमदार निलेश लंके कडुन एक कोटी रुपयांचा निधी
सरपंच सौ अरुणा प्रदीप खिलारी
गेल्या अनेक वर्षापासून बनाई वस्ती व बेटवस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी मिळावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच सौ अरुणा खिलारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्याकडे वेळोवेळी केली होती. या रस्ताचा पाठपुरावा निलेश लंके प्रतिष्ठान उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी त्यांच्याकडे केला होता त्यामुळे या वस्तीच्या रस्त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे सरपंच सौ अरुणा खिलारी यांनी सांगितले.