प्रशासकिय

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ २२५- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात १ हजार ३४४ कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण ७१ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार

अहमदनगर दि. 8 एप्रिल (प्रतिनिधी ):- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी प्रशासनाच्या तयारीने वेग घेतला असुन आज दि ७ एप्रिल रोजी २२५- अहमदनगर शहर विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी अशा तब्बल १ हजार ३४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणांना ७१ कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. या सर्व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींत्व अधिनियम १९५१ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.
या प्रशिक्षण सत्रावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल पाटील, उप विभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार संजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील नंदनवन लॉन्स व भाऊसाहेब फिरोदिया महाविद्यालय येथे दोन सत्रामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये आयोजित प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था आदीबाबतही माहिती देण्यात आली.तर दुसऱ्या सत्रात भाऊसाहेब फिरोदिया महाविद्यालय ईव्हीएम हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी मतदान प्रक्रियेबाबत तयार केलेल्या व्हिडीओचे प्रसारणही या प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले. मतदान यंत्र हाताळणी बाबत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे अजुन दोन प्रशिक्षण संपन्न होणार असुन नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहून निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया समजुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी उपस्थितांना केले.
यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथही देण्यात आली.
प्रशिक्षणास केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे