सामाजिक
दप्तर मुक्त शाळा या उपक्रमामध्ये जि. प. प्राथमिक शाळा चांदे खुर्दमध्ये प्रियंका युवराज सूर्यवंशी यांचे स्त्री शिक्षणाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान संम्पन्न

चांदे खुर्द दि. 11 ऑक्टोबर (प्रतिनिधी )दप्तर मुक्त शाळा या उपक्रमामध्ये जि. प. प्राथमिक शाळा चांदे खुर्दमध्ये प्रियंका युवराज सूर्यवंशी यांचे स्त्री शिक्षणाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान संम्पन्न झाले.
त्यांनी माता पालक व विद्यार्थ्यांना ओघवत्या भाषणशैलीतून या विषयाचे महत्त्व पटवून दिले. इ. चौथीतील विद्यार्थिनी आरोही अमर ससाणे हिने त्यांची छानशी मुलाखत घेतली. रामदास रघुनाथ सूर्यवंशी यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल वृक्षभेट देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रल्हाद आबा सूर्यवंशी, पत्रकार अमोलजी गंगावणे, दादासाहेब सूर्यवंशी, युवराज बापू सूर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक दिपक कारंजकर सर यांनी केले, आभार प्रदर्शन शिक्षक संतोष वायसे सर यांनी केले.