शनिवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

अहमदनगर :- राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. 24 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पं. जवाहरलाल नेहरू सभागृह येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत 3 ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) या वर्षांचा माहे
नोव्हेंबर २०२२ अखेर खर्चाचा आढावा, सन २०२२-२३ पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे, सन २०२३-२४ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) या आर्थिक वर्षाचा प्रारूप आराखडयास मान्यता देणे तसेच आयत्या वेळेच्या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
सर्व संबंधित विभागांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.