सामाजिक

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक कार्यालयासमोर उपोषण

पारनेर दि. 5 मार्च – (देवदत्त साळवे, तालुका प्रतिनिधी )-
बँकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या पॅनल प्रमुखाने बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी व शाखा व्यवस्थापक यांच्याशी संगनमत करुन पारनेर शाखेतून कोणताही अधिकार नसताना 45 लाख रुपये उचलून रकमेचा अपहार केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे.
अनेक वर्षे बँकेचा पैसा वापरून बँकेचे आर्थिक नुकसान केले असून हा बँकेच्या खातेदारांचा, ठेवीदारांचा विश्‍वासघात आहे. त्या रक्कमेचे व्याज संबंधितांकडून वसूल करावे, कलम 83, 88 व फौजदारी गुन्हा दाखल करावा, कर्जत शाखेतील 1 कोटी 79 लाख रुपये अपहार प्रकरणातील आरोपीला नवीन संचालक मंडळाने बँकेतून बडतर्फ करावे, कर्जत येथील लेखा परीक्षण अहवालानुसार तत्कालीन संचालक मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे-
बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या टोळीने बँकेतील 45 लाख रुपये निवडणुकीसाठी वापरले. आमच्यामुळे त्या पैश्‍याची मुद्दल व व्याज 25 लाख वसूली होणार आहे. नवीन संचालकांनी खोट्याला खोटे व खऱ्याला खरे म्हणायची भूमिका घेतली पाहिजे. गुन्हेगारांना पाठीशी घातले तर नवीन संचालकावर भविष्यात सदर रकमेची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे सदर पैसे वापरणाऱ्या टोळीवर कारवाई करून बँकेत पद्मभूषण जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांना अपेक्षित असा पारदर्शक कारभार करावा या मागणीसाठी विनायक गोस्वामी यांनी दिनांक 1/3/2024 पासून उपोषण सुरू केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे