आठ वर्षापासून आठ लाख रुपयांच्या दरोडयाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस बेलवंडी पोलिसांकडून अटक

अहमदनगर दि. ११ ऑगस्ट (प्रतिनिधी)आठ वर्षापासून आठ लाख रुपयांच्या दरोडयाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस बेलवंडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
बेलवंडी पोस्टे हद्दीमध्ये दिनांक 26/05/2016 रोजी हंगेवाडी गावचे शिवारात घोड कनॉलचे पुलाजवळ बोरी रस्त्यालगत इसम मंगेश व त्याचे सोबत चे 15 पुरुष व 1 महिला साथीदार यांनी स्वस्तात एक किलो सोने देतो बाबत अमिष दाखवुन विश्वास संपादन करुन रोख रुपये घेवुन बोलावुन घेवुन जावुन फिर्यादी गुलाब दौलत माळी , रा.अशोक नगर सातपूर नाशिक व फि॥चे मित्र गणेश छगन माहले व संतोष सुभाष शेळके, यांना लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करुन कुहाडी व कोयत्याचे हात्याराचा धाक दाखवुन बँगमधील रोख 8,50,000 /-रुपये व बोटातील सोन्याच्या दोन अंगठ्या व मोबाईल असे बळजबरीने चोरी करुन सोने न देता फसवणुक केली आहे.वगैरे म॥ चे फिर्यादीवरुन गुन्हा 76/2016 भादवि 395,420 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी चिंग्या टेमलाल भोसले रा येळपणे ता श्रीगोंदा हा येळपणे येथे असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली की,लगेच पो.स्टे कडील पोसई गाजरे, पोहेकॉ झुंजार,पोकॉ संदिप दिवटे ,पोकॉ विनोद पवार ,पोकॉ सतिष शिंदे ,पोकॉ शिपनकर सदर येळपणे गावात जावुन सापळा रचुन मागील 8 वर्षापासुन फरार आरोपीस दिनांक 10/08/20230 रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. पुढील तपास पोसई गाजरे हे करत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला , श्री प्रशांत खैरे साहेब, (उपविभागीय पोलिस अधिकारी), श्री विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे बेलवंडी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पोसई मोहन गाजरे,पोहेकॉ झुंजार,पोकॉ संदिप दिवटे ,पोकॉ विनोद पवार,पोकॉ सतिष शिंदे ,पोकॉ शिपनकर यांनी केली.