सामाजिक

बहुजन शिक्षण संघ व दादासाहेब रूपवते फाउंडेशनच्या वतीने रविवारी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त शाहीर दादू साळवे यांच्या भीम गीताचा कार्यक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन शिक्षण संघ व दादासाहेब रूपवते फाउंडेशनच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांना अभिवादन कार्यक्रमाचे नगर पुणे रोड येथील ओम गार्डन येथे आयोजन करण्यात आले आहे.
परिवर्तनवादी चळवळीतील शाहू फुले आंबेडकर व साहित्यिक अण्णाभाऊ साठे चळवळीतील तसेच रिपब्लिकन चळवळीतील सर्वांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त शाहीर दादू साळवे व सहकारी यांच्या भीम गीताचा कार्यक्रम रविवारी 14 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत सादर होणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अँड. संघराज रूपवते व समस्त भीमसैनिक यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे