शिक्षकांनी स्वच्छ व पारदर्शी व काटकसरी कारभार करू शकणाऱ्या मंडळाला मतदान करावे : बाजीराव मोढवे

अहमदनगर (प्रतिनिधी)
जुन्या पेन्शन संघटनेचा शिक्षक बँकेच्या निवडणुकीत कोणत्याही मंडळाला पाठिंबा दिलेला नाही जिल्ह्यातील तरुण डीसीपीएस धारक शिक्षकांनी स्वच्छ व पारदर्शी व काटकसरी कारभार करू शकणाऱ्या मंडळाला मतदान करावे असे आव्हान पेन्शन हक्क संघटनेचे विश्वस्त श्री बाजीराव मोढवे यांनी केले आहे. शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी दि.16/10/20022 रोजी मतदान होत आहे .डीसीपीएस बांधव शिक्षकांनी जिल्ह्यातील कोणत्याही मंडळाला पाठिंबा दिलेला नाही पेन्शन हक्क संघटना फक्त जुनी पेन्शन मिळण्यासाठी निर्माण झाली आहे सदर तरुण बांधवांना पेन्शन साठी लढा उभारला आहेए व पेन्शन मिळावी हा एकमेव उद्देश ठेवलेला आहे. पेन्शन पुढे बँकेची सत्ता नगण्य आहे . शिक्षक बँक निवडणुकीत चार आघाड्या आपले नशीब आजमावत आहेत मात्र यात काही मंडळं पेन्शन हक्क संघटना या नावाचा वापर करताना दिसत असून संघटनेचा आणि स्वराज्य मंडळासह कोणत्याही मंडळाचा काहीही संबंध नाही. ज्या तरुण शिक्षकांना ज्या मंडळाची विचारधारा आवडेल तिथं त्यांना मतदान करण्यास मोकळीक आहे. पेन्शन चळवळीचा वापर मंडळासाठी करू नये असे आवाहन विश्वस्त श्री.बाजीराव मोढवे यांनी केले आहे. दरम्यान शिक्षक बँकेच्या निवडणुकीत पेन्शन च्या लाभापेक्षा बँकेचा लाभ ज्यांना महत्त्वाचा वाटतो त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी संघटनेचा वापर करू नये असा गैरवापर करणाऱ्यांना डीसीपीएस धारकांनी थारा देऊ नये .बँक निवडणूकीनंतर सर्व मंडळातील डीसीपीएसधारकांना एकत्र घेऊन पुन्हा पेन्शन लढा नव्या जोमानं लढायचा आहे आणि सर्व मंडळांचेही सहकार्य या लढ्यात गरजेचे आहे असेही पत्रकात म्हटले आहे.