कौतुकास्पद

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अग्नीशास्त्रासह गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन इसमास अटक

राहुरी दि. 19 जानेवारी (प्रतिनिधी )
आज दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम देसी पिस्टल विक्री करता घेऊन येणार आहे. सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार गायकवाड सुरज, पोलीस हवालदार राहुल यादव, पोलीस हवालदार विकास साळवे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, पोलीस नाईक प्रवीण अहिरे, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे यांनी सापळा रचला असता प्राप्त माहितीनुसार काळा रंगाचे मोपेड गाडी क्रमांक MH 16 DH 5613 या गाडीवर किसन नामे
1) जॉन कॅसिनो परेरा, वय 36 दोघे राहणार अहमदनगर
2)अब्दुल वाहद सय्यद शाबिर वय 31,
हे देशी बनावटीचे पिस्टल 3 काडतुस सह व सोबतच गाडीचे डिक्की मध्ये लपवलेल्या 1440 gm गांजा मिळून आल्याने एकूण 104000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून NDPS कायद्यान्वये (CHANCE Raid) व Arms Act कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर प्रत्येकी दोन दोन गंभीर गुन्हे (कोतवाली पोलीस स्टेशन गु र न 470/21, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन गु र न 10/16, कोतवाली पोलीस स्टेशन गु र न 266/12 व गु र न 152/2017) असे एकूण 4 गुन्हे दाखल आहेत दाखल आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करत आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार गायकवाड सुरज, पोलीस हवालदार राहुल यादव, पोलीस हवालदार विकास साळवे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, पोलीस नाईक प्रवीण अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे